गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

पैशांसाठी धमकावल्याने आत्महत्या

पिंपरी : उसने दिलेले पैसे परत मागितले असता दमदाटी करून धमकावले. हा त्रास सहन न झाल्याने एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नवी सांगवीतील विनायकनगर येथे घडली.
उदय सुभाष तेलंग असे आत्‍महत्‍या केलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील नारायण कोंडल (रा. गणेशनगर, सांगवी) याच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. आरोपीने तेलंग यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेऊन त्या बदल्यात दरमहा तीन टक्के व्याजाने परतावा देण्याचे लेखी आश्वासन दिले. वर्षभर व्याज दिले. मात्र, त्यानंतर व्याज व मुद्दलाची परतफेड न करता उलट पैसे मागितल्यावर धमकावले. या त्रासाला कंटाळून उदय यांनी आत्महत्या केली.

अल्पवयीन मुलावर कोयत्‍याने वार
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना चिंचवड, दत्‍तनगर येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी छैया पातरे, करण दोढे (रा. विद्यानगर, चिंचवड) आणि त्‍यांचा एक साथीदार यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. दत्तनगर कमानीजवळ फिर्यादी मित्रासह दुचाकीरून जात होते. त्‍यावेळी आरोपींनी त्‍यांना अडवून जुन्‍या भांडणाच्‍या कारणावरून कोयत्याने वार केला. त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

रिक्षाने कट मारल्याच्या रागातून रिक्षाचालकाला मारहाण
पिंपरी : रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून एकाने रिक्षाचालकाला दांडक्याने मारहाण केली. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली. विशाल (रा. साने चौक, चिखली) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. तर आकाश गायकवाड (रा. अजंठानगर, चिंचवड) जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्‍यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ दिगंबर गायकवाड भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही आरोपीने मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com