मद्यपी चालकांचा पोलिसांनी उतरविला नक्षा

मद्यपी चालकांचा पोलिसांनी उतरविला नक्षा

Published on

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ : शहरात वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या मद्यधुंद वाहनचालकांवर पोलिस कारवाई करीत आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनचालकांची ‘ब्रेथ ॲनलायझर’द्वारे तपासणी केली जाते. यात मद्यपान केलेले वाहनचालक हाती लागतात. या वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तीन हजार २३८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मद्यपींना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिस वेळोवेळी कारवाई करीत असतात. महत्त्वाचे चौक, मुख्य रस्ते अशा ठिकाणी पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी केली जाते. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.
----------------
मद्यापी चालकांमुळे हे धोके
- वाहनावर नियंत्रण राहत नाही
- वाहन अतिवेगात तसेच वेडेवाकडे चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते
- स्वतःच्या तसेच इतरांच्याही जिवाचा विचार केला जात नाही
- रस्त्यावर वादाचे आणि त्यातून मारामारीचे प्रकार
- प्राणघातक अपघाताची शक्यता वाढते
---------------------------
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई
महिना कारवाई
जानेवारी ३४६
फेब्रुवारी ३५६
मार्च ६८८
एप्रिल २८९
मे १७५
जून १७०
जुलै ३३२
ऑगस्ट ३०८
सप्टेंबर ३२०
ऑक्टोबर २५४
एकूण ३२३८
----------------------------------------
मद्यपान करून वाहन चालविल्यास स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो. बहुतांश अपघात मद्यपान करून चालविल्याने झाल्याचे समोर येते. अशा दुर्घटना रोखण्यासाठी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मद्यपी वाहनचालक आढळल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
--------------------------------------
मद्यपी वाहनचालक बेशिस्तपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन दामटतात. आपण शिस्तीत जात असतानाही मद्यपी वाहनचालक गाडी अंगावर घालतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. अशा मद्यपी वाहनचालकांवर वेळोवेळी कारवाई होणे गरजेचे आहे.
- रवींद्र खेडकर, वाहनचालक
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com