आळंदी यात्रेनिमित्त गुरुवारपासून जादा पीएमपी बस

आळंदी यात्रेनिमित्त गुरुवारपासून जादा पीएमपी बस

Published on

पिंपरी, ता. १० ः कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त १३ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) एकूण ३६२ बस सोडण्यात येणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १५ ते १७ नोव्हेंबर या काळात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रातराणी बस सेवा देण्यात येणार आहे.
आळंदी यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक आळंदीत दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी यात्रा काळात पीएमपीएमएलकडून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी आणि पुणे शहरातील स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन या स्थानकांवरून जादा २२९ आणि नियमित मार्गावर सुरू असलेल्या १३३ अशा एकूण ३६२ बस सोडण्यात येणार आहेत. १३ व १८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बस सेवा सुरू राहणार आहे. आळंदी यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटे वस्ती येथून बसचे संचलन करण्यात येत आहे.

जादा तिकीट दर
रातराणी बससेवेसाठी सध्याच्या तिकीट दरापेक्षा दहा रुपये जादा तिकीट दर आकारण्यात येणार आहे. तसेच रात्री एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पास चालणार नाहीत, असे पीएमपीएमएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


तीन मार्ग बंद
आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे बसमार्ग क्र. २५७ आळंदी ते मरकळ, बस मार्ग क्र. ३६४ आळंदी ते चाकण आंबेठाण चौक व बस मार्क क्र. २६४ भोसरी ते पाबळ हे तीन बसमार्ग या काळात संपूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com