चोऱ्या हजारांत; तपास शेकड्यात

चोऱ्या हजारांत; तपास शेकड्यात

Published on

पिंपरी, ता. ११ : शहरात जबरी चोऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे होत असताना किरकोळ चोऱ्यांचे प्रकारही वाढत आहेत. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होतात. त्यात केवळ गंभीर गुन्ह्यांचीच जास्त दखल घेतली जाते. त्यामुळे गुन्हे हजारांत; तपास शेकड्यात अशी स्थिती झाली आहे.
चालू वर्षातील दहा महिन्यांत किरकोळ व इतर चोरीच्या सव्वा हजारापेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील केवळ ३८८ गुन्हे उघडकीस आले. किरकोळ गुन्हे मात्र तपासाच्या दृष्टीने बेदखल केले जात आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास होऊन आपल्याला न्याय मिळावा, अशी तक्रारदाराची अपेक्षा असते. तक्रार दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रार पोलिस ठाण्यात फेऱ्या मारतो. गंभीर गुन्हा नसल्याने ‘तपास सुरु आहे’ असे पठडीतील उत्तर मिळते. असाच प्रकार इतर चोऱ्यांच्या बाबतीत घडतो. यामुळे किरकोळ व इतर चोऱ्या उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसते.
------------------
तक्रारी नोंदीपुरत्याच
चोरीच्या गुन्ह्यातील रक्कम अथवा मुद्देमालाची किंमत कमी असल्याने तक्रार करूनही पोलिस गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी आहे. काही प्रकरणांत तक्रारदारही फारसा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे अनेक तक्रारी नोंदीपुरत्याच उरल्याची स्थिती आहे.
----------------------
किरकोळ, इतर चोऱ्यांचे प्रकार
- वाहन चोरणे
- सायकल चोरणे
- दुचाकी पळविणे
- दुचाकीचे पार्ट चोरणे
- पाकीट मारणे
---
जबरी चोऱ्यांचे प्रकार
- सोनसाखळी ओढून पळून जाणे
- मारहाण करून ऐवज लुटणे
- शस्त्राचा धाक दाखवून ऐवज लुटणे
- शरीराला इजा करून ऐवज लुटणे
---------

इतर चोऱ्यांची आकडेवारी (जानेवारी ते ऑक्टोबर)
महिना गुन्हे उघड
जानेवारी १३८ ४५
फेब्रुवारी ११८ २७
मार्च १४१ ४६
एप्रिल १०२ २८
मे १२८ २७
जून १३६ ३८
जुलै १४५ ४१
ऑगस्ट १६२ ४९
सप्टेंबर १४२ ४९
ऑक्टोबर १४९ ३८
----------------------------------------
एकूण १३६१ ३८८
---
या वर्षातील जबरी चोऱ्या, घरफोड्या
घटना गुन्हे उघड उघड टक्केवारी
जबरी चोरी - १६३ १४२ ८७
घरफोडी - २२७ ११० ४८
---------------------------------------
दखल
सोनसाखळी प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच युद्धपातळीवर तपास करून यातील आरोपीला पोलिसांनी दोनच दिवसात पाठलाग करून अटक ऐकली. त्याच्याकडून सोनसाखळी चोरी व घरफोडीचे प्रत्येकी चार गुन्हे व वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला.
--------------------------

बेदखल

पिंपळे गुरवमधील नेताजीनगरमधील तरुणाची दुचाकी २७ जून रोजी चोरीला गेली. याप्रकरणी दोन जुलैला सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तरुणाने पोलिस ठाण्यात अनेकदा फेऱ्या मारल्या. मात्र, पाच महिने उलटूनही दुचाकीचा शोध लागलेला नाही.
----------------
तपासाच्यादृष्टीने सर्वच गुन्हे महत्त्वाचे असतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच तपास हाती घेतला जातो. गंभीर गुन्ह्यांसह इतरही गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्तीचे प्रमाण पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे चांगले आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
-------------------

Marathi News Esakal
www.esakal.com