थंडी, धूर, धुळीने लहानग्यांना श्वसनाचे आजार

थंडी, धूर, धुळीने लहानग्यांना श्वसनाचे आजार

Published on

पिंपरी, ता. १२ : शहरीकरण, विकासकामे आणि प्रदूषण यामुळे थंडीत धूर व धुळीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, श्‍वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचा त्रास प्रामुख्याने लहानग्यांना होत आहे. आपण पालक म्हणून त्यांची योग्य काळजी घेतल्यास हिवाळा आरोग्यदायी ठरू शकतो असे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले, तर वर्षभर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. हिवाळ्यातील कोरडे व आरोग्यदायी हवामान, बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी फळे व भाज्या आणि भूक वाढल्याने हा ऋतू तब्येत सुधारण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने तसेच धुळीचे प्रमाण वाढल्याने हिवाळ्यात श्‍वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे थंडीत आहार विहाराबाबत योग्य काळजी घेतली गेली नाही तर सर्दी, खोकला,दमा, ब्रोन्कायटिस, ॲलर्जेटिक दमा यासारखे आजार थंडीत वाढतात. लहान मुलांमध्ये या आजारांचा संसर्ग लगेचच होतो. मुलांना झालेला सर्दी खोकला एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर पसरतो. त्यामुळे हे आजार उद्भवू नये म्हणून मास्क वापरणे आवश्‍यक असल्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

- हे करावे
लहान मुलांना गरम व लोकरीचे कपडे घालावेत
कानटोपी, हातमोजे, मोजे यांचा वापर करावा
पौष्टिक व प्रोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा
हवामान कोरडे असल्याने स्निग्ध पदार्थ आहारात घ्यावेत
ताजे व गरम अन्न खावेत. उदा. भाज्यांचे व डाळींचे सूप
वारंवार हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता पाळावी
व्यायामाची सवय लावावी

- हे टाळावे
थंड व बाहेरील पदार्थांचे सेवन
उघड्यावरील ज्यूस, थंड पेये, आइस्क्रिम यांचे सेवन
आजारी व्यक्तींनी मुलांजवळ जाऊ नये
मुले आजारी पडल्यास त्यांना बाहेर पाठवू नये

हिवाळा सुरू झाला, की बाह्यरुग्ण विभागात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण कमी होतात. मात्र, थंडीत योग्य काळजी घेतली नाही तर घसा खवखवणे, सर्दी खोकला यांच्यासारखे आजार वाढतात. त्यामुळे बाहेर पडताना मास्क वापरणे, पोषणयुक्त आहार घेणे, योग्य व्यायाम करणे या गोष्टींचा थंडीत अवलंब केला पाहिजे. ’
- दीपाली अंबिके, बालरोग विभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com