गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

मोबाईल उचलला नाही म्हणून
पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी : मोबाईल केला असताना तो उचलला नाही म्हणून तळेगाव दाभाडेमध्ये पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी राजश्री संतोष बिसनाळ (रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संतोष नागप्पा बिसनाळ याच्यावर गुन्हा दाखल केला. संतोषने राजश्री यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पोटावर बूटांनी मारले, तसेच गळ्यावर पाय ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
-----------------------
कोयता बाळगल्याने एकावर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या कोयता बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. भोसरीतील बैलगाडा घाट परिसरात ही कारवाई करण्यात आली. शाम गजानन शिंदे (वय १९, रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे कोयता असल्याची माहिती मिळताच पोलिसांना त्याला ताब्यात घेतले आणि कोयता जप्त केला.
-----------------

Marathi News Esakal
www.esakal.com