स्वरुप बलवीर, अर्णव चव्हाणकडून सुवर्णपदकांचा वेध

स्वरुप बलवीर, अर्णव चव्हाणकडून सुवर्णपदकांचा वेध

Published on

पुणे, ता.१६ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स नेमबाजी स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलांमध्ये पीप साईट रायफल १० मीटर प्रकारात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल (रहाटणी) च्या स्वरुप बलवीर याने तर १४ वर्षांखालील १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूल (नांदे)च्या अर्णव चव्हाण याने विजेतेपद पटकाविले.
सदाशिव पेठेमधील रेणुका स्वरुप हायस्कूलमध्ये वरील स्पर्धा सुरू आहे. अंजली भागवत शूटिंग अकादमीचे सहाय्यक प्रशिक्षक अनिकेत माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १२ वर्षांखालील पीप साईट रायफल १० मीटरमध्ये चंदननगर येथील केंद्रीय विद्यालय ९ बी.आर.डी.च्या ओजस जगताप याने ३४५ गुणांसह द्वितीय तर चऱ्होलीच्या रॅडक्लिफ स्कूलचा श्रीअंश पांचाळ ३३७ गुणांसह तृतीय स्थानी राहिला.
१४ वर्षांखालील मुलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारातील लढती अतिशय चुरशीच्या झाल्या. अवघ्या एकेका गुणाची मोठी चुरस पाहायला मिळाली. नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अर्णव चव्हाण याने विजेतेपदाला गवसणी घातली. त्याने ३५७ गुण प्राप्त केले. तर त्याचा निकटचा प्रतिस्पर्धी आणि उपविजेता चऱ्होलीच्या रॅडक्लिफ स्कूलच्या स्वर कुमावत याने ३५६ गुण प्राप्त केले. उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूल शिवांश कुलथे (३५५ गुण) याला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

उर्वरित निकाल
पीप साईट रायफल १० मीटर ः १२ वर्षांखालील मुले - निशाद महाजन (सिंबायोसिस, प्रभात रस्ता) ३४९, आरव शर्मा ३३०, आरुष चव्हाण (दोघेही ध्रुव ग्लोबल, सूस) ३२८, अद्ववोय कारोले (पवार पब्लिक, हडपसर) ३२३, श्रेयस दहिफळे (द लेक्सिकॉन, हडपसर) ३१५, रिशिक कुंदर (विबग्योर, हिंजवडी) ३१५, पार्थ देवांग (आर्मी पब्लिक ३, घोरपडी) ३१३, श्लोक दवे ३०९, तेज मॅथ्यू (दोघेही चत्रभुज नरसी, हडपसर) ३०५.
एअर पिस्तुल १० मीटर ः १४ वर्षांखालील मुले - निशाद महाजन (सिंबायोसिस, प्रभात रस्ता) ३४९, आरव शर्मा ३३०, आरुष चव्हाण ३२८ (दोघेही ध्रुव ग्लोबल, सूस), अद्ववोय कारोले (पवार पब्लिक, हडपसर) ३२३, श्रेयस दहिफळे (द लेक्सिकॉन, हडपसर) ३१५, रिशिक कुंदर (विबग्योर, हिंजवडी) ३१५, पार्थ देवांग (आर्मी पब्लिक ३, घोरपडी) ३१३, श्लोक दवे ३०९, तेज मॅथ्यू (दोघेही चत्रभुज नरसी, हडपसर) ३०५.

Marathi News Esakal
www.esakal.com