पिंपरी-चिंचवड
वाचक लिहितात
भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले
दरवर्षी दिवाळीनंतर हिवाळ्यात भाजीपाल्याच्या किमती कमी होत असतात. परंतु या वर्षी भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वच भाज्यांचे भाव सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या महागलेल्या भाजीपाल्याचे किती पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडतात हेही गुलदस्त्यातच राहते. फायद्याचा मोठा वाटा दलाल आणि व्यापाऱ्यांना होतो हे उघड सत्य आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्याच्या मार्गात भाजीपाल्याचे भाव वाढत असतात. वाढत्या किमतीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे भाजीवाल्यांची संघटित लूटमार सुरूच राहणार आहे.
-शिवराम वैद्य, निगडी

