पिंपरी-चिंचवड
मिळकतकर थकबाकीदारांवर दोन टक्के विलंब शुल्क
पिंपरी, ता. १७ : चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर न भरलेल्या मिळकतधारकांच्या पहिल्या सहामाहीची रक्कमेवर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क (दंड) लागू झाला आहे. दुसऱ्या सहामाहीतील अर्थात ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळातील देयकातील रक्कमेवर लवकरच दोन टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी वेळेत कर भरणा करून अतिरिक्त भुर्दंड दंड टाळावा, असे आवाहन महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी केले आहे. तसेच, थकबाकीदारांना नोटीस देऊन जप्तीची कठोर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

