पिंपळे गुरवमध्ये मोटारीची तोडफोड करणाऱ्या तिघांवर गुन्हा

पिंपळे गुरवमध्ये मोटारीची
तोडफोड करणाऱ्या तिघांवर गुन्हा
Published on

पिंपरी, ता. ११ : ऑफिससमोर उभी असलेली मोटारीची तोडफोड करून शिवीगाळ, धमकी आणि जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सहा जून रोजी आणि रविवारी (ता. ८) पिंपळे गुरव परिसरात घडली. व्यंकटेश राजेंद्र भोसले, विघ्नेश गुणशिलन रंगम (दोघेही रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), अनिकेत उरणकर उर्फ उन्या अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. आरोपी रंगम याला पोलिसांनी अटक केले आहे. मनीष गोविंद राठी (वय ४३, रा. गंगोत्रीनगर लेन नं. २, पिंपळे गुरव) यांनी याबाबत मंगळवारी (ता. १०) सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पवळेवाडीत जमिनीच्या वादातून मारहाण
पिंपरी : जमिनीच्या वादातून ज्येष्ठ शेतकऱ्यावर कांद्याची सुरी आणि दगडाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्‍यातील पवळेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एक महिला आरोपी, शुभम बापू पवळे (रा. पवळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. कांताराम लक्ष्मण पवळे (वय ६०, रा. पवळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून त्‍यांनी याबाबत चाकण पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

भांबोलीत डंपरच्‍या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीस्वारास मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वाराचा मृत्यू झाला. ही घटना भांबोली गावच्‍या हद्‌दीत मंगळवारी सकाळी पावणे बाराच्‍या सुमारास घडली. गणेश बाळू जाधव (वय २७, रा. कुरकुंडी, ता. खेड) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वार तरुणाचे नाव आहे. कानिफराय दिगंबर बांबले (वय ३४, रा. आंबेठाण) असे अटक करण्‍यात आलेल्‍या डंपर चालकाचे नाव आहे. गोरक्षनाथ काळुराम घावटे (वय ३०, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

चिखलीत गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक
पिंपरी : सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून विक्रीस ठेवणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी मोरेवस्‍ती, चिखली येथे करण्‍यात आली. रितेश सतीश कानवटे (वय १९, रा. मोरेवस्ती) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तसेच अखिल पोपट मुलाणी यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलिस हवालदार किरण अर्जुन जाधव (वय ३८) यांनी चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

चांदखेडमध्ये दारू विक्री; महिलेवर गुन्‍हा दाखल
पिंपरी : बेकायदा विक्रीसाठी दारू तयार करताना एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी (ता. १०) सायंकाळी चांदखेड येथे ही कारवाई करण्‍यात आली. या प्रकरणी चांदखेड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस हवालदार रितेश माणिक कोळी यांनी शिरगाव पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

म्‍हाळुंगेत चालकावर दगडाने हल्ला
पिंपरी : ट्रकने मागून टेम्‍पोला धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने टेम्‍पो चालकाला दगडाने मारहाण केली. टेंपोचेही नुकसान केले. ही घटना सोमवारी रात्री पावणे बाराच्‍या सुमारास म्‍हाळुंगे येथे घडली. ट्रक (एमएच १२ एलटी ९७५३) यावरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. रवी सुखदेव जाधव (वय ३९, रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com