सावधान, तुमच्याकडे पाहतोय ‘तिसरा डोळा''
पिंपरी, ता. ९ : शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासह रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक बाब वाहतूक पोलिसांच्या व कॅमेऱ्याच्या नजरेस येणे अशक्य आहे. यावर एक उपाय म्हणून पोलिसांनी नागरिकांनाही सहभागी करून घेतले आहे. यास मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्या नागरिकांना सावध व्हावे लागेल.
वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रकार नागरिकांना पुराव्यासह मांडता यावेत म्हणून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी व्हॉट्सअॅप चॅट बॉट सुरू केला आहे. त्या क्रमांकावर एखाद्या नागरिकाने संदेश पाठविल्यानंतर भाषा निवडण्याचा पर्याय येतो. त्यानंतर नाव विचारले जाते. मग वाहतूक नियमाचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, अनियमितता, खराब रस्ता, अवैध पार्किंग, वाहतूक सिग्नल समस्या, सूचना शेअर करा, जड-अवजड वाहनांद्वारे वाहतुकीचे उल्लंघन, ट्रॅफिक बडी टीममध्ये सहभागी व्हा असे नऊ मुद्दे दिले जातात. जी समस्या अथवा तक्रार आहे त्याचा क्रमांक टाकल्यानंतर एक लिंक येते. त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करता येतो. ही माहिती वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात पोहोचते. संबंधित वाहतूक विभागाला तक्रारीबाबत कळविले जाते. त्यानंतर कार्यवाही केली जाते.
-------------
दृष्टिक्षेपात
- १८ जून ः उपक्रमास प्रारंभ
- १ हजार ३३ ः ट्रॅफिक बडी व्हाट्सअप चॅट बॉटद्वारे आलेल्या तक्रारी
- ८०७ ः सोडविण्यात आलेल्या तक्रारी
- २२६ ः वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द झालेल्या तक्रारी
- ४६८ ः वाहतूक नियम मोडल्याच्या तक्रारी सर्वाधिक
- १६४ ः अवैध पार्किंग
- १२६ ः खराब रस्ते
- १२० ः वाहतूक कोंडी
- २४ ः अनियमिततेची नोंद
- ३२ ः वाहतूक सिग्नलची समस्या
- ९२ ः सूचना शेअर करा
- ७ ः जड-अवजड वाहनांद्वारे नियमांचे उल्लंघन
----------------------------------------
८७८८६४९८८५
---
नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन कार्यवाही केली जात आहे. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत राखण्यासह अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
----------------------
त्रिशतकी नोंदणी
आतापर्यंत विविध वाहतूक विभागांतर्गत एकूण ३०० ‘ट्रॅफिक बडी’ स्वयंसेवक म्हणून सक्रिय आहेत. मोबाईलवर आलेल्या मेसेजवरील नऊ नंबरचा अंक टाइप केल्यानंतर यासाठीचा अर्ज येतो. तो भरून द्यावा लागतो. त्यानुसार, ट्रॅफिक बडी टीमकडून पडताळणी होते. त्यानंतर ‘ट्रॅफिक बडी’ झाल्याबाबतचा संदेश प्राप्त होतो.
----------------------------
38680
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.