गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

शेअरच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

पिंपरी : शेअर खरेदीच्या बहाण्याने एका महिलेची नऊ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना देहूरोड येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रचित गोयल, दिव्या सूचक या व्यक्तींसह इतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी एका अॅपद्वारे कमी दरात शेअर्स खरेदी करण्याचे आश्‍वासन देत फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्‍यानंतर फिर्यादीकडून विविध बँक खात्यांवर नऊ लाख ४० हजार ४०६ रुपयांची रक्कम जमा करून घेतली. परंतु, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही.


रहाटणीत वेटरला लोखंडी हँडलने मारहाण
पिंपरी : दुचाकी बाजूला घेतल्‍याच्‍या कारणावरून वेटरवला लोखंडी हँडलने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रहाटणी येथील प्यासा बारमध्ये घडली. सुखाचार्य दारबा हळनर (वय १९, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव असून या प्रकरणी त्‍यांनी काळेवाडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ मामा शिवदास माकणे (वय ४०, रा. साई दर्शन सोसायटी, ताथवडे) व पंडित अशोक अंदगुले (वय ३६, रा. शिवतीर्थनगर, रहाटणी) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी हे प्यासा बारमध्ये वेटर म्हणून काम करत असून बारसमोर उभी असलेली दुचाकी फिर्यादी बाजूला घेत होते. त्‍यावेळी आरोपींनी ‘त्याला कोणाला विचारून गाडीला हात लावला’, असे म्‍हणत शिवीगाळ केली. आरोपी पंडीत याने शटरच्‍या लोखंडी हँडलने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.


गॅस चोरी प्रकरणी एकावर गुन्‍हा
पिंपरी : घरगुती गॅसची बेकायदा चोरी करून तो इतर सिलिंडरमध्‍ये भरत असलेल्‍या तरुणावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही कारवाई भोसरी येथील धावडेवस्ती येथील प्रकाश गॅस सर्व्हिसेस या दुकानात करण्यात आली.
मंगेश दिगंबर भोयर (वय ३४, रा. अंकुशनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. आरोपीने कोणतीही सुरक्षितता न बाळगता धोकादायकरित्या घरगुती गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरला. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून कारवाई केली.


मॅफेड्रॉन विक्री प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी : मॅफेड्रॉन विक्री प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडीतील विनोदे वस्‍ती येथे कारवाई करण्‍यात आली. कैलास मोहन राम (वय २७, रा. चिखली, मूळ रा. जोधपूर, राजस्‍थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा रचून विनोदे वस्‍ती कमानीजवळून कैलास याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडे एक लाख १३ हजार ४०० रुपये किंमतीचा ११.३४० ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन सापडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com