अपहारप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : मोटारीचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडीतील ओटास्कीम येथे घडला. विलास उत्तम राठोड (रा. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इमरान नईम खान (रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ओळखीचा असलेल्या आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीची मोटार नेली. मात्र, नंतर त्या मोटारीचा अपहार केला.
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी येथे घडली. या प्रकरणी रौनक वासुदेव डोलवाणी (रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
जुगारप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : रस्त्यालगत पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या एकावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई महाळुंगे येथील एच.पी. चौक येथे करण्यात आली. भरत जैस्वार (वय ३८, रा. महाळुंगे, मूळ रा. वरळी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एक हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
---