रक्षाबंधनच्या दिवशी पीएमपीएमएलला विक्रमी उत्पन्न
आकडे चेक करायला बातमीदाराला सांगितले आहे, त्यानुसार दुरुस्ती करू.
रक्षाबंधन ‘पीएमपीएमएल’साठी विक्रमी
एकाच दिवसात दोन कोटी ६१ लाखांचे उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी (ता. ९) दोन कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा आकडा विक्रमी ठरला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात यंदा तब्बल ७२ लाख आठ हजार रुपयांनी वाढ झाली. यात तिकीट दरातील वाढ हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. ‘पीएमपीएमएल’ इतिहासात प्रथमच एका दिवसात अडीच कोटींचा टप्पा पार केला.
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. काही नागरिक प्रवासासाठी स्वतःच्या वाहनांऐवजी ‘पीएमपीएमएल’ बसला प्राधान्य देतात. रक्षाबंधननिमित्त वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ‘पीएमपीएमएल’ प्रशासन दरवर्षी मार्गांवर जादा बस सोडते. यंदाही पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रात शनिवारी एक हजार ९९४ बस सोडण्यात आल्या होत्या.
‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात ठेकेदारांच्या ‘सीएनजी’ बसही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा जादा बस सोडणे शक्य झाले. शनिवारी सुमारे १२ लाखांवर प्रवाशांनी ‘पीएमपीएमएल’ बसमधून प्रवास केला. यामधून दोन कोटी ६१ लाख १९ हजार २७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. एक जून पासून तिकीट दरवाढ लागू झाल्यामुळे ‘पीएमपीएमएल’चे उत्पन्न वाढले आहे. रोज सुमारे दोन कोटी ३४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
-----------
रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीएमएलला मिळालेले उत्पन्न हे आत्तापर्यंत मिळालेल्या उत्पन्नापैकी सर्वाधिक आहे. प्रवाशांनी ‘पीएमपीएमएल’वर दाखवलेला विश्वास आणि चालक, वाहक आणि इतर सर्वांनी घेतलेल्या कष्टामुळे हे शक्य झाले.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, ‘पीएमपीएमएल’
---------
आकडे बोलतात
वर्ष - मार्गावरील - उत्पन्न
२०२३ - १९३० - १,९५,२७,३८४
२०२४ - १८२२ - १,८९,१०,९०२
२०२५ - १९९४ - २,६१,१९,०२७
------
तपशील
- २ कोटी १६ लाख ९९ हजार ८६९ रुपये ः तिकीट विक्री
१५ लाख ८२ हजार २४० रुपये ः पास विक्री
- २७ लाख ९९ हजार ४१८ रुपये ः मोबाईल ॲपवरील तिकिटे
एकूण ः २ कोटी ६१ लाख १९ हजार २७ रुपये
-----