दुपारची लोणावळा - पुणे लोकल हवी ः रेल्वे प्रवासी संघ
पिंपरी, ता. १० : कोरोनामध्ये बंद झालेली दुपारची लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे. ही सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून होत आहे.
पुण्यातून लोणावळा, पिंपरी चिंचवड या भागात जाणारी संख्या मोठी आहे. पनवेल, तळोजा, तळेगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी ही औद्योगिक क्षेत्र असल्याचे कामगार देखील रेल्वेचा वापर करतात. मुंबई - पुणे चारपदरी मार्गाची देखील गरज आहे. मात्र, तत्पूर्वी दुपारीची लोकल सुरू करण्याबाबतची मागणी आता जोर धरू लागली आहे. पिंपरी चिंचवड दिशेने येणारे अनेक एक्सप्रेस, पॅसेजर गाड्यांचे थांबे कमी केले आहेत. सिद्धेश्वर, कन्याकुमारी, कोल्हापूर अहमदाबाद, मुंबई पधानपुर फास्ट, कोल्हापूर मुंबई सहयाद्री, पुणे कर्जत पॅसेजर, कोयना, हैदराबाद, कोणार्क, चेन्नई या एक्सप्रेस कर्जत येथे थांबा मिळावेत. तर, लोणावळयात मद्रास सीएसएम टी, एलटीटी सीबीइ, एनसीजे सीएसएमटी, अहमदाबाद हमसफर, जोधपूर, हुसैन सागर, मुंबई सीएसएम टी, दादर पुदुचेरी, सीएसएम टी चेन्नई एगमोरे, सिद्धेश्वर, मुंबई लातूर एक्सप्रेस थांबे मिळावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी केली.