संवाद माझा

संवाद माझा

Published on

संवाद माझा

नाम मार्गफलक पुन्हा बसवावेत
पिंपळे निलख येथील बापूजी बुवा मंदिर चौक ते रक्षक चौक या रस्त्याचे नाव ‘माजी सरपंच चंद्रकांत जगताप पथ’ असे आहे. रक्षक चौक येथे तसा फलकही होता. पण, तेथे पुलाचे काम सुरू असल्याने फलक काढला गेला आहे. तरी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाने नाम मार्गफलक पुन्हा संबंधित दोन्ही चौकांत बसवावेत.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V39430

तळेगाव रेल्वे स्थानकाबाहेर अतिक्रमणे, कोंडी
तळेगाव रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या काही दिवसांपासून अशा टप्पे वाहतूक करणाऱ्या रिक्षा चारही बाजूंना उभ्या करुन भर रस्त्यावर प्रवासी भरले जातात. हा वर्दळीचा वीरचक्र चौक; एक तर अवैध प्रवासी टप्पे वाहतूक आणि वर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य प्रवेश द्वारासमोर दुचाकींचे बेकायदेशीर वाहनतळ झाले आहे. स्थानिक प्रशासन मात्र कारवाई करत नाही. रेल्वे प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था न केल्याने ही सगळी वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. या बारा मीटरच्या रस्त्यावर अतिक्रमणेही झाली असून रेल्वे प्रवाश्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
NE25V39431

तोडलेल्या फांद्या त्वरित उचलाव्यात
पालिका हद्दीत बऱ्याचशा ठिकाणी बंगले-सोसायटीच्या भिंतीबाहेर तोडलेल्या फांद्या ठेवलेल्या असतात. त्या वेळेवर उचलल्या जात नाहीत. त्यामुळे परिसरात कचरा साचतो, जो आरोग्यासाठी धोकादायक आहे. थेरगावच्या डीपी रस्त्यावर असाच प्रकार कुणाल रेसिडेन्सीसमोर दिसत आहे. पालिकेने याची दखल घेऊन स्वच्छता करावी.
- रमेश पाटील, थेरगाव
PNE25V39429

पुलाच्या नामफलकाची दुरवस्था
लोहमार्गावरील प्राधिकरण आणि बिजलीनगर यांना जोडणाऱ्या पुलाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकने ‘क्रांतिवीर चापेकर’ यांचे नाव दिले आहे. पण, आता या नामफलकांची दुरवस्था झाली आहे. तरी, तो तातडीने बदलून नवा आणि ठळक नामफलक लावावा.
- सिराज बशीर शेख, प्राधिकरण
PNE25V39427

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com