संवाद माझा

संवाद माझा

Published on

बांधकामाने धुळीच्या प्रमाणात वाढ
चिंचवड येथील एका महाविद्यालयामध्ये बांधकाम चालू असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चिखल येतोय. रस्त्यावर धुळीचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे.
- दीपक दातीर, चिंचवड स्टेशन
PNE25V39696

अपूर्ण इमारतीने पादचाऱ्यांना धोका
नाशिक फाटा येथे मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पदपथावर एक इमारत अपूर्ण अवस्थेत पाडलेली आहे. इमारतीचा काही भाग आणि बाहेर आलेले लोखंडी गज हे पदपथावरुन जाणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर टांगत्या तलवारी प्रमाणे आहेत. जुनाट गंजलेल्या सळया व काँक्रीटचा भाग कोसळेल, याची भीती खालून जाताना कायम वाटत असते. पदपथ सुरक्षित करणे गरजेचे आहे.
- सुनील ढोबे, मोशी
PNE25V39695


वल्लभनगरचे चेंबर धोकादायक
वल्लभनगर एसटी स्थानकावरुन रस्ता ओलांडून महामार्गावर आल्यावर डाव्या हाताला पदपथावरच हे चेंबर चक्क उघडे आहे. लोखंडी जाळी नाही की सिमेंटचे झाकण नाही. खोली ५ फुटांच्या आसपास. मोठ्या सिमेंटच्या वाहिन्यांची जोडणी होणे बाकी आहे. वाहनांची वर्दळ जास्त अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. महापालिकेने दखल घ्यावी हीच विनंती.
- रमेश पाटील, वल्लभनगर
PNE25V39698

वाहतुकीचे नियोजन करा
पवनानगरमधील सेव्हन ‍ऑरेंज हॉस्पिटल ते जुना जकात नाका या रस्त्यावर श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शाळा आहेत. सायंकाळी ५.३० ते ५.४५ वाजता शाळेतून मुले घोळक्याने बाहेर पडतात. मुला- मुलींना घेऊन जाणारे पालक दुचाकी, चारचाकी पण घेऊन येतात. रस्ता अरुंद असल्याने प्रचंड गर्दी असते. ज्येष्ठ, महिला व लहान मुलांना धोका पत्करून जावे जावे लागते. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागला. तो पडला; तर त्याला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे. या गर्दीवर काही तरी उपाय करण्याची आवश्यकता आहे; अन्यथा एखादा मोठा अपघात होऊ शकतो.
- रमेश डोंगरे, चिंचवड
25V39706 , PNE25V39702

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com