शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये ध्वजवंदन उत्साहात

शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये ध्वजवंदन उत्साहात

Published on

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी-चिंचवड शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक तसेच सेवाभावी संस्थांमध्ये ध्वजवंदन उत्साहात झाले.
‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’ अशा देशभक्तिपर घोषणा तसेच ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ या गीताच्या स्वरांनी वातावरण भारावून गेले.

श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ
श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळातर्फे सरस्वती शाळेतील शिक्षकांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

श्री टागोर शिक्षण संस्था
भोसरीतील श्री टागोर शिक्षण संस्थेत सुभाष गेटे महाराज यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले. अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार विठोबा लांडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष महेश घावटे, नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक विलास मडीगेरी, नम्रता लोंढे, योगेश लोंढे, शिवराज लांडगे, राजू लांडे, विष्णू लांडगे, मुख्याध्यापक उद्धव ढोले, हनुमंत आगे, संतोष काळे, मनिषा गुरव व पर्यवेक्षक शिवाजी गुरव आदी यावेळी उपस्थित होते. राजू पवार यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत आगे यांनी आभार मानले.

चोपडा हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा प्रशाला-कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर येथील संयुक्त कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ उद्योजक सतीशचंद चोपडा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी जयप्रकाश राका, प्रकाशचंद बंब, रमणलाल शिंगवी व किरण राका उपस्थित होते. क्रीडा शिक्षक संदीप माशेरे व रवींद्र गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट व गर्ल गाइड तसेच प्राथमिक विभागाच्या बनी- टमटोला विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना संचलनातून मानवंदना दिली. प्राचार्य विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केला. यावेळी मुख्याध्यापिका वर्षा काटकर, विभाग प्रमुख नीता कटारिया व शिक्षक प्रतिनिधी अलका बारगजे उपस्थित होत्या. प्राथमिक विभागातून तेजस सूर्यवंशी व स्वरा सरदेशमुख या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. संगीत शिक्षिका संगीत विशारद साधना भालेकर यांनी देशभक्तिपर गीत सादर केले. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत गत वर्षातील पालकांना शासनाच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. संध्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी आभार मानले.

श्री शिवछत्रपती प्राथमिक
श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रकार सादर केले. यावेळी अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शहरप्रमुख संभाजी शिरसाट उपस्थित होते. उद्योजक तानाजी गोंदवले, सामाजिक कार्यकर्ते राजाराम मोरे यांच्या हस्ते ध्वज व प्रतिमेचे पूजन झाले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वर्षे) जयंतीनिमित्त ‘पसायदान’ सादर करण्यात आले. रोहिणी डामरे यांनी प्रास्ताविक, तर श्रीकांत किर्तीकर यांनी निवेदन केले.

अरविंद एज्युकेशन सोसायटी
जुनी सांगवीतील लिटल फ्लॉवर स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी आणि कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम झाले. दहावी व बारावीत प्रथम आलेल्या सायली सात्रस, वेदिका सिद्धवगोल, बुऱ्हानुद्दीन दलाल, शेहजाद शेख या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दहावी-बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्रदीप सातरस, अनंत सिद्धवगोल, वीणा सिद्धवगोल, कौसर शेख, युसूफ दलाल, लिटल फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटल

फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, पर्यवेक्षिका प्रीती पाटील, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक आदी उपस्थित होते. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. पर्यवेक्षिका
सीमा हवालदार यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका शिल्पा पालकर यांनी आभार मानले.

कामगार कल्याण मंडळ
संत तुकारामनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे नागरिकांना पर्यावरण रक्षण व प्लॅस्टिक बंदीची शपथ अण्णा जोगदंड यांनी दिली. मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या संगीता जोगदंड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शिशुविहारातील मुलांना खाऊ वाटण्यात आला. केंद्र संचालक अनिल कारळे सूत्रसंचालन केले. यावेळी सुदाम शिंदे, सुरेखा मोरे, शाम गायकवाड, यादव तळोले, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, काळूराम लांडगे, कवी शामराव सरकाळे, पांडुरंग सुतार, अंकुश जाधव, शिवराम गवस, का किरण कोळेकर उपस्थित होते.

श्री गुरू गणेश विद्यामंदिर
श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे मानद सरचिटणीस ॲड. राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक चिटणीस अनिलकुमार कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त अशोककुमार लुनिया यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रमुख पाहुणे सुमतिलाल ओस्तवाल, मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य सुरेश नवलाखा उपस्थित होते. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका योगिता भेगडे यांनी प्रास्ताविक केले. अंश पतंगे, आसावरी जोशी या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. विद्यार्थिनींनी देशभक्तिपर गीत सादर केले. प्राथमिक विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. प्राचार्य हनुमंत मारकड यांनी आभार मानले. मारुती तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे, लक्ष्मण गुंजाळ, संतोष सुरवसे यांनी संयोजन केले.

संचेती शैक्षणिक संकुल
संचेती शैक्षणिक संकुलात पिंपरी चिंचवड विभागाच्या विषयतज्ज्ञ भारती माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सामूहिक पसायदान सादर करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनलाल संचेती, सचिव वर्षा टाटिया, उपाध्यक्ष आदित्य टाटिया, संचालिका ऐश्वर्या बेदमुथा, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार, प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, संचेती इंग्रजी माध्यम व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अभ्रा राय आदी उपस्थित होते.

जी स्टॅम्प कंपनी
चाकण येथील जी स्टॅम्प कंपनीत विभागीय संचालक (ऑपरेशन्स) ॲलेक्स झिडकोव्ह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, मात्र त्यांनी शौर्य जाधव या मुलाला हा मान दिला. राजेश जाधव यांनी झेंडा गीत सादर केले. यावेळी वित्त विभागाचे प्रमुख पंकज वारके, मनुष्यबळ विकास विभागाचे कुंदन गाडे, युनियन प्रतिनिधी अमित येळवंडे, सुरक्षारक्षक, हाऊसकीपिंग सुपरवायझर दीपक चौधरी, दत्ता मेंगळे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरीतील खराळवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष महापौर योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
सोहम् सार्वजनिक ग्रंथालय
संत तुकारामनगर येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेत महापालिकेचे क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, फ विभाग साहाय्यक आयुक्त अतुल पाटील, पालिका ग्रंथालय विभाग प्रमुख प्रतिभा मुनावत, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चाबुकस्वार, ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रम झाला. ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

निगडी सेक्टर २२
निगडी सेक्टर नंबर २२ मधील अंकुश चौक परिसरात एक ते पंधरा इमारतींच्या रहिवाशांतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भंडारी यांनी ध्वजवंदन केले. यावेळी ग्रुप निगडीचे चेअरमन विजय वाघमारे, राम कदम, सौरभ वाघमारे, अक्षय गायकवाड, अजून जमादार, आकाश दलाल, सुनील कांबळे, अंबादास गायकवाड, राजू पाटोळे, राजू मस्के, रशीद अत्तर, उत्तम पारशे, आनंद बनपट्टे, लक्ष्मण जाधव, हमीद जमादार, सलीम शेख, निर्मोही यादव उपस्थित होते.

मॉडर्न हायस्कूल
निगडीतील मॉडर्न हायस्कूलमध्ये निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, सनदी लेखापाल शेखर साने यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी शैक्षणिक संकुलातील शाखाप्रमुख प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी, प्रा. डॉ. अतुल फाटक, प्राचार्य डॉ. मनोज साठे, संचालिक डॉ. मैथिली अर्जुनवाडकर, संस्थेचे सदस्य राजीव कुटे, प्राचार्या शारदा साबळे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत, प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, प्राथमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, शिशु गटाच्या मुख्याध्यापिका संगीता घुले, विजय पाचारणे, अनिल अढी आदी उपस्थित होते. यावेळी शिशुगटाच्या मुलांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

अभिराज फाउंडेशन
वाकड येथील अभिराज फाउंडेशनमधील दिव्यांग मुलांच्या शाळेत वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, लायन्स क्लब ऑफ रहाटणीचे संचालक अशोक बनसोडे, यशस्वी क्लासेसच्या संचालिका आदर्श शिक्षिका मंगला डोळे-सपकाळे, अभिराज फाउंडेशनचे संचालक रमेश मुसूडगे, पालक संघाचे सदस्य सिद्धार्थ उघाडे, वुई टुगेदरचे सचिव जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद,धनंजय मांडके, पालक संघाचे सदस्य धनंजय बालवडकर मुख्याध्यापिका अनिता चव्हाण आदी उपस्थित होते. संतोष कोळी या दिव्यांग विद्यार्थ्याने प्रार्थना म्हटली.

विज्ञान केंद्र
पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात संस्थापक संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया, महापालिकेच्या सीएसआर विभागाचे प्रमुख विजय वावरे, निवृत्त पोलिस अधिकारी व पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे अनिल गालिंदे, मोहन लोंढे, गजानन चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, सुनील पोटे, मल्लाप्पा कस्तुरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया आदी उपस्थित होते.

अभिषेक इंटरनॅशनल स्कूल
मोशी येथील अभिषेक इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात कर्नल एस. पी. शुक्ला, कॅप्टन कृष्णकुमार पुनिया, चेअरमन गुरुराज आर. चरंतीमठ, कार्यकारी संचालिका गीता चरंतीमठ, व्यवस्थापन सदस्य अभिषेक चरंतीमठ, मुख्याध्यापिका सुधा भट आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देसाई आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. दहावीची विद्यार्थिनी लावण्या उघाडे आणि शिक्षिका प्रिया आमले यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर आधारित नाटिका सादर केली.

गोलांडे विद्यालय
चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका उज्वला चौधरी, मुरारी मुंडकर, सचिव चंद्रशेखर पाटील, श्रीकांत जोशी, राजाभाऊ गोलांडे, श्रीमती मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रम झाला. विद्या सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. लता डेरे यांनी आभार मानले.

जैन महाविद्यालय
श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालय, सौ. ताराबाई शंकरलालजी मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि श्री गुरू गणेश इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला. यावेळी मंडळाचे मानद सरचिटणीस ॲड. राजेंद्रकुमार मुथा यांनी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक सचिव प्रा. अनिलकुमार कांकरिया यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्राचार्या सुनीता नवले यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुचिता पाटील यांनी आभार मानले. प्राचार्या सारंगा भारती, श्री गुरू गणेश इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख शैलजा गायकवाड यावेळी उपस्थित होते. रुचिता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन तेजस्विनी कालेकर, साधना भळगट, भाऊसाहेब लोखंडे, ताहेरा तांबोळी, स्नेहल चानोदिया यांनी केले

एच. ए. शाळा
एच. ए. शाळेमध्ये एच.ए. व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांच्या ध्वजवंदन झाले. यानंतर एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. शाळाप्रमुख दर्शना कोरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपशाळाप्रमुख आशा माने, पर्यवेक्षिका मनीषा कदम, शिक्षक प्रतिनिधी विजया तरटे, अमिना पानसरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कपिल पाटील, सहसचिव स्मिता झेंडे उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक मुकेश पवार आणि शिल्पा राशीनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
चिंचवडगावातील शिवसेनेच्या वेताळ नगर शाखेतील कार्यक्रमाला शहर संघटक संतोष सौंदणकर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, सागर चिंचवडे, इम्रान पानसरे, सागर चिंचवडे, शाखाप्रमुख मजीद शेख, कय्यूम पठाण, किशोर सातपुते, रफिक बेग, कुदरत खान, राजू मासाळकर, शिवाजी तांबे, सपना बनसोडे, कलावती नाटेकर, माया कुलथे, यास्मीन पठाण, रूपाली तेलंगी, रेखा गायकवाड, अंजना करांडे, अश्विनी धावरे, राणी काळभोर, शीतल काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्टन कॉलनी
रस्टन कॉलनीत अध्यक्ष डी. एम. पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विलास कंक, असलम शेख, सुभाष मालुसरे, पवार ताई, सुमीत कांबळे, आर. जी. पाटील, गुलाब मुलाणी, फिरोज खान, महेश कुंभार, मोहन वायकुळे आदी उपस्थित होते.

अहीर सुवर्णकार समाज
अहीर सुवर्णकार समाजाच्या पिंपरी-चिंचवड शाखेत डॉ. योगेश अहिरराव सपत्निक उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार,दीपक सोनार, सुनील निकुंभ, कैलास पैठणकर, प्रवीण दुसाने, सचिन देवरे, महिला प्रमुख स्मिता सोनार, अनिता सोनार यांच्यासह समाज बांधवांनी सहभाग घेतला.

शिवाजी राजे माध्यमिक
श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुणकुमार सिन्हा, उद्योजक दर्शन धामणकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तिसरीची विद्यार्थिनी तनिष्क हिरे हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, उपाध्यक्ष अमित बच्छाव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर दिलीप देशमुख , महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी अनिल लोंढे, उद्योजक राजशेखर चावला, मावळचे माजी सरपंच एकनाथ शिर्के, उपसरपंच अनंता घुले, युवराज गटे, पालक संघाचे सदस्य रवींद्र बिरादार उपस्थित होते.

यशस्वी शिक्षण प्रसारक
यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व यशस्वी इंग्लिश स्कूलमध्ये रोटरी क्लब उद्योग नगरी पिंपरीचे अध्यक्ष वैभव गवळी व सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाऊ आल्हाट यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, सचिव डॉ. तुषार देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. यावेळी मोशीतील सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट, अर्चना सस्ते उपस्थित होते.

सयाजीनाथ महाराज विद्यालय
वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर तसेच सांस्कृतिक गीतांचे सादरीकरण केले. यावेळी संकल्प डेव्हलपर्स ग्रुपचे हनुमंत गायकवाड, तरुण कुमार पटेल, सतीश सोनवणे नीलेश पटेल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी प्राचार्य राजकुमार गायकवाड, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुधीर शिंगटे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम अप्पा तापकीर, राजू तापकीर आदी उपस्थित होते. विद्यालयातील देविका मोरे, आदिती शेंगर, श्रेया यमलवार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक शिरीषकुमार सूर्यवंशी यांनीही स्वातंत्र्याचा इतिहास भाषणातून सांगितला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com