गौण खनिजांतून कोट्यवधींचा महसूल
पिंपरी, दि. १३ : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २०२४ पासून यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतच १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे.
२०२४ पासून यंदा सप्टेंबरपर्यंतचा गौणखनिज उत्खनन व रॉयल्टी वसुलीचा अद्ययावत अहवाल आला आहे. यंदा अजून तीन महिने बाकी आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत रॉयल्टची प्रकरणे आणि महसुलाची रक्कम यंदा वाढण्याची अपेक्षा आहे. वाळू, मुरूम, खडी, दगड आदी गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलाचा अहवाल महत्त्वाचा ठरतो.
दरम्यान, या कार्यक्षेत्रातील विविध प्रशासनिक कार्यालयांनीही उत्खनन व वाहतूक परवानग्या दिल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने गेल्या वर्षी १०, तर यंदा ११ प्रकरणांमध्ये परवानग्या दिल्या. हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून २०२४ मध्ये २०, तर यंदा ३७ प्रकरणांमध्ये उत्खनन व वाहतूक परवानग्या देण्यात आल्या. या परवानग्यांमुळे बांधकाम क्षेत्र, रस्ते विकास आणि इतर नागरी प्रकल्पांना आवश्यक असणारे कच्चे साहित्य उपलब्ध होत असून स्थानिक महसुली उत्पन्नालाही चालना मिळत आगे. प्रशासनाकडून या सर्व परवानग्यांवर देखरेख ठेवली जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अप्पर तहसिल कार्यालयाने दिली.
---
दृष्टिक्षेपात
रॉयल्टी
वर्ष ः प्रकरणे ः जमा महसुल
२०२४ ः १८९ ः ५ कोटी ३८ लाख ७२ हजार २६३
२०२५ ः १६९ ः ४ कोटी ४६ लाख ९८ हजार १३६
उत्खनन
२०२४ ः १२ कोटी ४९ लाख ११ हजार ७६३
२०२५ ः ७ कोटी ८४ लाख २८ हजार २२१
(आकडेवारी सप्टेंबर अखेरपर्यंत)
---
अवैध उत्खननाबाबत तक्रारी
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू आहे. त्याबाबत शहरातील नागरिक सतत तक्रारी करत आहेत. काही जणांनी या बाबत उपोषणाचाही इशारा दिला आहे. रीतसर परवानगी आणि रॉयल्टीमधून उत्पन्न घेत असल्याचा दावा कार्यालय करत असले तरी प्रत्यक्षात कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
---
पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षांत गौण खनिज बाबत नियोजित पद्धतीने कारभार सुरू आहे. शासन महसूल वाढविण्यात या विभागाने सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. तक्रारींवर कारवाई केली आहे. अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.