इच्छुकांना आरक्षणाची उत्सुकता

इच्छुकांना आरक्षणाची उत्सुकता

Published on

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. तीन प्रभागांमध्ये काही अंशी बदल वगळता ३२ पैकी २९ प्रभागांत काहीही बदल नाही. म्हणजेच २०१७ प्रमाणेच बहुअंशी प्रभाग आहेत. मात्र, तीन प्रभागांत झालेल्या थोड्या बदलाचा परिणाम आरक्षणातील जागांवर होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे नेमके कोणत्या प्रभागात आरक्षण पडणार ? आणि महापौरपद कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ पासून विविध कारणांनी रखडली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे राज्य सरकारने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १२८ जागांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानेही प्रभाग रचना केली आहे. त्यास अंतिम मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रभाग एक चिखलीमधील ताम्हाणेवस्ती परिसर प्रभाग बारा तळवडेला जोडला आहे. प्रभाग सहा धावडेवस्तीचा गावजत्रा मैदान व नवीन भोसरी रुग्णालय परिसर प्रभाग सात भोसरी गावठाणाला जोडला आहे. प्रभाग २४ थेरगाव लक्ष्मणनगरमधील म्हातोबावस्ती परिसर प्रभाग २५ वाकड - ताथवडे - पुनावळेला जोडला आहे. त्यामुळे २०१७ ला असलेले प्रभाग २४ मधील एससी संवर्गासाठीचे आरक्षण अन्य प्रभागात सरकणार आहे. शिवाय, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रभाव अधिक असलेला भाग ताम्हाणेवस्ती तळवडेला जोडल्यामुळे मतदानावर प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग सहा व सातमधील बदलांमुळे येथील मतदारसंख्या कमी असल्यामुळे फारसा फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, मतांवर परिणाम होईल, हे निश्चित आहे. त्याचा फायदा की तोटा कोणाला होणार?, याचेही गणिते मांडली जात आहेत.

चक्राकार आरक्षणाचीही चर्चा
मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका व महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अधिनियम २०२२ नुसार मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मध्ये सुधारणा केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश नऊ ऑक्टोबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राचे प्रभागांमध्ये विभाजन करून त्यांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहेत. त्यातील तरतुदीनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात महिला, अनुसूचित जाती (एससी), एनुसूचित जमाती (एसटी) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गासाठी जागांचे वाटप करणे (आरक्षण काढणे) आणि त्या चक्रानुक्रमे फिरवण्याचे नमूद केले आहे. हीच पद्धत पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीही राबविली जाणार का? असा मुद्दा इच्छुकांमध्ये चर्चेत आहे. मात्र, अद्याप आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याने आरक्षण कसे पडणार याचीच उत्सुकता दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com