सकाळ संवाद

सकाळ संवाद
Published on

पिंपरीगावातील पुतळा साफ करा
पिंपरी वाघेरे गावठाणातील पुतळ्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या पुतळ्यावर चिमणी, कावळे आदी पक्षांनी विष्ठा केली आहे. फरश्या निखळल्या आहेत. कोनशिलावरची नावे पुसली गेली आहेत. पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु त्यातील कोणालाही या पुतळ्याची दखल घ्यावी वाटत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुतळ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V60475


गौतम बुद्ध उद्यानातील दिवे चालू करा
दापोडी येथील तथागत गौतम बुद्ध उद्यानात विद्युत खांबावरील दिवाबत्ती चालू करावी. जेणेकरुन लोकांना उद्यानात फेरफटका मारणे आणि व्यायाम करण्यासाठी सोयीस्कर व्हावे. त्यांना अंधारात अडचणी निर्माण होऊ नये किंवा भविष्यात कोणत्याही गैरप्रकार होऊ नये म्हणून लवकरात लवकर विद्युत रोषणाई चालू करावी. ही विनंती.
- अकील अ. शेख, दापोडी
PNE25V60477


पथदिव्यांवरील झाडांची छाटणी हवी
चऱ्होली बुद्रुक येथील पाटोळे वस्ती येथील अनेक पथदिव्यांवर झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पूर्णपणे पोहोचू शकत नाही. परिसरात रात्रीच्यावेळी खूप अंधार पसरतो. या अंधारामुळे पादचारी आणि वाहनचालकांना गैरसोय होत आहे. चोरी, अपघात आणि इतर गैरप्रकारांची भीती वाढली आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन ​पथदिव्यांभोवतीच्या वाढलेल्या झाडा-झुडपांची तातडीने छाटणी करावी.
- ​निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रुक
NE25V60474


भारतमातानगरातील सांडपाणी तुंबली
दिघीतील भारतमातानगर रस्त्यावरील सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तीन महिने झाले तरी अजून वाहिनी साफ झालेली नाही. पूर्ण घाण रस्त्यावर येत आहे. तरी आरोग्य विभागाने कृपया लक्ष द्यावे.
- श्याम गायकवाड, दिघी
NE25V60473

भोसरीतील खड्डा बुजवा
भोसरी येथील हॉटेल जायका, सारस्वत बँक, तुळजा भवानी मंदिरासमोर महिनापासून मोठा खड्डा पडला आहे. खड्डा चुकवताना वाहनचालकांचा अपघात होता होता वाचतो. कृपया, महापालिकेने तो खड्डा बुजवावा. ही विनंती.
- दिलीप भामरे, भोसरी
NE25V60472

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com