विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम
(अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग प्रथम वर्ष विभागातर्फे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या दृष्टिकोनातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर, प्राचार्य डॉ. फारुक सय्यद व विभाग प्रमुख डॉ. एस. एम. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली झेरॉन २०२५ संकल्पनेअंतर्गत उपक्रम राबविला. प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांनी काव्य, नृत्य, गायन, पोवाडा, पथनाट्य अशा विविध कला प्रकार सादर केले आहेत. प्रा. प्रकाश माळी व डॉ. शोभा रुपनार आदींनी संयोजन केले.
(61268)
विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘मेंटल वेल बिईन्ग थ्रू कौनसेल्लिंग’ विषयावर विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा झाली. गीता होनराव यांनी मानसिक तणावाचे नियोजन, भावनिक समतोल याबाबत मार्गदर्शन केले. ध्यान, व्यायाम व प्राणायामाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमधील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. प्रा. केतकी साळवे, प्रा. सृतुजा जाधव यांनी संयोजन केले. प्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. ढोले, उपप्राचार्या प्रा. डॉ. वृषाली तांबे यांनी मार्गदर्शन केले. नवनाथ वाळके व सावित्री यादव यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
टॉप्स संमेलन आणि ज्ञानप्रदर्शन
- नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
भारतीय गुणवत्ता संस्था पुणे शाखेतर्फे आयोजित ‘टॉप्स संमेलन २०२५’ आयआयसीएमआर एमबीए विभागात यशस्वी झाले. यात २६४ सहभागी आणि ८० प्रकल्प व सेवा संघांनी केस स्टडी, सर्वोत्तम पद्धती आणि गुणवत्ता सुधार प्रकल्प सादर केले. प्रेम गजपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मनोज कोल्हटकर प्रमुख पाहुणे होते. पराग औटी आणि देवराज चत्तराज यांनी संयोजन केले. संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शीतल माने व दीप्ती बाजपई यांच्या समन्वयाने ४४ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम गुणवत्ता व्यवस्थापन, संघभावना व उद्योग-शिक्षण सहयोग वाढवणारा ठरला.
वाचक प्रेरणा दिन उत्साहात
दिवंगत राष्ट्रपती तथा शास्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आंतरसंस्था पुस्तक परीक्षण स्पर्धा झाली. ग्रंथपाल बाळू कुचेकर यांनी स्वागत केले. स्निग्धा शुक्ला यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. दीपाली सवाई यांनी पुस्तक परीक्षणाचे महत्त्व सांगितले. स्पर्धेचा निकाल ः विजेते प्राध्यापक ः शीतल माने (वपुर्झा), दीप्ती बाजपाई (फ्लुइड), प्रीथा प्रसिद (माइंडसेट), रुपाली मोडक (द वन थिंग). विजेते विद्यार्थी ः विजय अमृतकर (अग्निपंख), सारिका शेलार (द अलकेमिस्ट), समर्थ कोटकर (मृत्युंजय).
(61269)