पिंपरी-चिंचवड
खरेदी लक्ष्मी पूजनसाठी (फोटो फिचर)
तयारी लक्ष्मी पूजनाची
दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होत असली, तरी दिवाळीचे मुख्य पर्व हे लक्ष्मीपूजन असते. मंगळवारी हा दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची सोमवारी बाजारपेठांत लगबग सुरू होती. यात प्रामुख्याने पूजेसाठी झेंडूची फुले, लक्ष्मीची प्रतिमा, मूर्ती, लक्ष्मीची पावले, पूजनासाठी लागणारी फळं तसेच आदी साहित्य खरेदी करत लक्ष्मी पूजनासाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचीच ही चित्रमय झलक.