स्वर, संस्कृती, अध्यात्माचा दिवाळी पहाटमध्ये संगम

स्वर, संस्कृती, अध्यात्माचा दिवाळी पहाटमध्ये संगम

Published on

पिंपरी, ता.२१ ः श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ आणि ताल-निनाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरमय दिवाळी पहाट आध्यात्मिक, पौराणिक आणि भावनिक उंची गाठणारी ठरली.
‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘तुज नाम आले ओटी’, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘हे राम हे राम’, ‘अच्युतम् केशवम्’ अशा भक्तिगीतांनी उपस्थित रसिकांची मनं हरखून गेली. दत्ता शनाय, कपिश भोळे, सुहास जोशी, भावना कवडे, तृषा जगताप, नाईशा सहानी, सोहम दलाल या कलाकारांमुळे साऱ्या सभागृहात सुरांचा दरवळ पसरला. या सादरीकरणात त्रिष्णा लष्करे, अक्षय वरूणकर, समृद्धी सरवदे, यशदा भसे, काव्यांजली जाधव, शरण्या पटाडे, चैतन्या राजपूत आदींनी सहभाग घेतला. सचिन शिंगाडे, अर्चिता शिंगाडे यांनी हार्मोनियमवर तर शुभम पाटोळे, पार्थ कदम, ऋचिर शिंदे, दीपक उभे, आदित्य बालवडे, सूरज सरवदे यांनी तबल्यावर अप्रतिम साथ दिली.

सभासदांच्या सहभागाने रंगत
ज्येष्ठ नागरिक संघ विकासनगर यांच्या साप्ताहिक सभेत दिवाळी पहाट कार्यक्रमात संघाच्याच सभासदांनी भाग घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. महिला सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
राज्याच्या ग्रामीण संस्कृतीचे सुलभ दर्शन घडविले तसेच इतर सभासदांनी हिंदी, मराठी गाणी सादर करून प्रशंसा मिळवली. रवींद्र कदम, राजाभाऊ महाले यांनी कृष्ण-सुदामा भेट अप्रतिमरित्या सादर केली. अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, रवी कुलकर्णी, महादेव चौधरी, कैलास येवले, पी. वी. आर्या यांनी केले. नीलेश तरस यांनी संघास ध्वनीक्षेपक यंत्रणा भेट दिली.

भक्तिगीते, लावणी अन् कव्वाली
पिंपळे गुरव ः भूपाळी, गवळणी, विठ्ठलाची भक्तिगीते, लावणी, कव्वाली, हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘सूरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे.
नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात कार्यक्रम झाला. ‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायक चंद्रकांत शिंदे, चित्रसेन भवार, गायिका वर्षा एखंडे, राजेश्वरी पवार यांनी विविध गाणी सादर केली. ‘नवीन हे वर्ष सुखाचे जावो’, ‘मेरे झोपडी में प्रभू श्रीराम’, ‘बाहो में चले आ’, ‘उठी उठी गोपाळा’ आदी गाणी सादर केली. संतोष खंडागळे, सुनील गायकवाड, नीलेश देवकुळे, गोविंद कुडाळकर यांनी साथ संगत केली. योगेश सुपेकर यांनी निवेदन केले. विजय उलपे यांनी संयोजन केले.

भक्तीचा स्वरनाद
मोशी ः दिवाळीच्या मंगलप्रभातीत शिवतेज प्रतिष्ठानचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायक अनिल घाडगे आणि गोकुळ निकुंभ यांनी ‘दीपज्योती परमब्रह्मा’ , ‘गायत्री मंत्राची स्वररचना’, ‘शिवस्तुतीची भक्ति गाणी’ सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com