अवजड वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासन सरसावले
अवजड वाहनांवरील निर्बंध अधिक कडक
पुनावळे, मारुंजी भागातील स्थिती; वाहतूक विभाग, आरटीओ, पोलिस, पीएमआरडीए यांचे एकत्रित प्रयत्न
पिंपरी, ता. २७ ः पिंपरी चिंचवड शहरातील अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता विविध प्रशासकीय विभाग सरसावले आहेत. पुनावळे व मारुंजी या भागात गेल्या पंधरवड्यात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघींचा बळी गेल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अवजड वाहनांवर निर्बंध लावण्याची मागणीही जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहतूक विभाग, आरटीओ, पीएमआरडीए यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत अवजड वाहनांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग, आरटीओ, पीएमआरडीए या विभागांनी काही जबाबदाऱ्या विभागून घेतलेल्या आहे. यामध्ये मिक्सर व डंपरवर कारवाई करण्यासासोबतच आरएमसी प्लॅंटची तपासणी करणे, नियमबाह्य आढळल्यास कारवाई करणे यासोबतच वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, असेही प्रतिबंधात्मक उपाय राबवले जाणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाय व जबाबदार विभाग
- अवजड वाहनांच्या ब्लाईंज स्पॉटबाबत दुचाकी चालकांमध्ये जनजागृती करणे ः वाहतूक विभाग
- विनापरवाना प्लॅंटवर निष्कासणाची कारवाई करावी ः पीएमआरडीए व वाहतूक विभाग
- बांधकाम प्रकल्पामध्ये आरएमसी प्लॅंट उभारण्यासाठी प्रोत्साहन देणए ः पीएमआरडीए
- पिंपरी चिंचवड शहरात अवजड वाहनांचा वेग हा प्रतितास किलोमीटर मर्यादित ठेवणे ः आरटीओ व वाहतूक विभाग
- अवजड वाहनांचे अपघात झाल्याच्या ठिकाणांचा नकाशा तयार करणे व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ः वाहतूक विभाग
- मिक्सर व डंपरसारख्या अवजड वाहनांची फिटनेस तपासणी आरएमसी प्लॅंटला जाऊन करणे, ओव्हरलोड वाहनांना दंड करणे ः आरटीओ, वाहतूक विभाग
- विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर कारवाई करणे ः वाहतूक विभाग
- बायपासच्या बाजूच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी एनएचआयकडे पाठपुरावा करणे ः वाहतूक शाखा
- मेट्रोच्या कामाची जिथे पूर्तता झाली आहे, अशा भागातील राडारोडा उचलण्यास सांगून रस्ता रहदारीसाठी मोकळा करणे ः पोलिस, उपायुक्त
- अवजड वाहनांच्या मालकांची बैठक घेऊन सुरक्षिततेच्या सूचना देणे ः आरटीओ
‘‘बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आरटीओ, वाहतूक विभाग व पीएमआरडीएचे अधिकारी एकत्रितरीत्या शहरातील प्रत्येक आरएमसी प्लॅंटची पाहणी करणार आहोत. सूचना देऊनही जर आरएमसी प्लॅंटकडून निर्बंधांचे पालन होत नसेल तर थेट कारवाई करण्यात येईल. या शिवाय अवजड वाहनांवर जीपीएस, साइड कॅमेरे, स्पीड ट्रॅकर बसविण्याबाबतही सूचना देण्यात येत आहेत.
- विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

