पुणे ग्रँड टूर स्पर्धेची पिंपरी चिंचवडमध्येही जय्यत तयारी

पुणे ग्रँड टूर स्पर्धेची पिंपरी चिंचवडमध्येही जय्यत तयारी

Published on

पिंपरी, ता. १ : जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे संकट असताना सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी २३ जानेवारी २०२६ रोजी ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ स्पर्धा होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २० हून अधिक देशातील उत्कृष्ट सायकलपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात पिंपरी चिंचवड शहराचाही सहभाग असणार आहे.

स्पर्धेच्या मार्गावरील पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्ती, खड्डेमुक्ती, बॅरिकेडिंग, पथदिवे दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जात आहे. या शिवाय सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देत विविध चौक, रस्ते आणि सार्वजनिक स्थळांवर स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी आणि हरित उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील बकालपणा हटविण्यासाठी विशेष पथके नेमून नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. पथदिव्यांच्या खांबावरुन टाकलेल्या सेवावाहिन्यांचे एकत्रीकरण केले जात आहे. सायकल चालवताना अडथळा ठरणारे गतीरोधक, उंच गतिरोधक स्लोप तयार करुन गुळगुळीत केले आहेत. रस्त्यातील चेंबर डांबरी रस्त्यासमान करण्यात येत आहेत. त्याची कामे वेगाने सुरू आहेत. धोकादायक गतिरोधके हटवणे, सांडपाणी व पावसाळी वाहिन्यांचे चेंबर रस्त्याला समांतर करणे, रस्त्यांकडेला फुलझाडे व सजावटी दिवे बसवणे, अशी कामे केली जात आहेत.

स्पर्धेचा मार्ग
सांगवीतील राजीव गांधी उड्डाणपूल येथून स्पर्धेला सुरुवात होऊन औंध-रावेत बीआरटी मार्ग, डांगे चौक, रावेत, भक्ती-शक्ती चौक, केएसबी चौक, टाटा सर्कल, इंद्रायणी चौक, पीसीएनटीडीए चौक, स्पाईन रोड, केएसबी चौक, एम्पायर इस्टेट चौक, काळेवाडी फाटा, रक्षक चौक मार्गे परत राजीव गांधी उड्डाणपूल येथे समाप्ती होईल. त्याचबरोबर बाणेर, बालेवाडी येथील स्पर्धा देखील शहराच्या काही भागातून जाणार आहे.

स्पर्धेत ७० ते ८० च्या वेगाने सायकलपटू धावतील. विनाअडथळा ही स्पर्धा पार पाडण्यासाठी स्पर्धेच्या मार्गावर प्रकाशयोजना, स्वच्छता व सायकल चालवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाणार आहे. या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक नकाशावर कोरले जाईल.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com