मोजणीसाठी हेलपाट्यांना पूर्णविराम
पिंपरी, ता. १ : जमिनीची मोजणी अधिक अचूक, सुटसुटीत आणि पारदर्शक होण्यासाठी शासनाने विकसित केलेली ‘ई-मोजणी व्हर्जन-२’ ही नवी प्रणाली पिंपरीतील नगरभूमापन कार्यालयाने गेल्या महिन्याभरापासून सुरू केली आहे. आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने नागरिकांचा वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुख्य म्हणजे जमिनीच्या मोजणीसाठी नागरिकांना पूर्वीप्रमाणे कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
नव्या प्रणालीमध्ये नागरिकांना क्षेत्रफळ, सर्व्हे/गट क्रमांक, सहधारकांची माहिती आणि सातबारा असे जमिनीचा तपशील स्वतः ऑनलाइन भरता येतात. यामुळे नोंदीतील चुका कमी होतात आणि कार्यालयीन अवलंबित्वही घटते. अर्ज पोर्टलवर सबमिट केल्यानंतर शुल्क भरता येते आणि त्यानंतर संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन तांत्रिक साधनांच्या मदतीने अचूक मोजणी करतात. संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती पोर्टलवर व संदेशाद्वारे अर्जदारापर्यंत पोचते. त्यामुळे पारदर्शकता लक्षणीयपणे वाढणार आहे. शासनाच्या डिजिटल उपक्रमाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेली ही प्रणाली ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पिंपरीत या प्रणालीमुळे जमीन मोजणीची प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि नागरिकांसाठी अधिक सोपी करण्यात नवा टप्पा गाठल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या प्रणालीचे फायदे
- अचूक व सुटसुटीत मोजणी होणार.
- नागरिकांना अर्ज करण्यापासून तपशील, शुल्क भरणे सर्व ऑनलाइन करता येते
- कार्यालयातील हेलपाटे थांबणार
- कागदपत्रांवरील अवलंबित्व संपणार
- सर्व पोर्टलवरच नोंदवले जात असल्याने अनियमितता, गैरसमज किंवा गैरप्रकारांना आळा बसेल
- अर्जदार आणि प्रशासन या दोघांच्याही वेळेत बचत
- पोर्टलवर सातबारा, सहधारक तपशील यांची सुरक्षित जतन व्यवस्था असल्याने भविष्यातील नोंदणी, सीमांकनासाठी उपयोगी ठरते
- मोजणीवरून वाद कमी होणार
मोजणीच्या प्रतिक्षेचे काय ?
अनेकदा मोजणीसाठी नागरिक नगरभूमापन कार्यालयात अर्ज करतात. मात्र कर्मचारी संख्येअभावी, तसेच अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे मोजणीला अनेक महिने प्रतिक्षा करावी लागते. केवळ राजकीय लोकप्रतिनिधी अथवा महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ऑनलाइन कार्यप्रणाली विकसित झाली असली तरी मोजणीच्या प्रक्रियेला गती देणे आवश्यक आहे.
---
पिंपरीमधील कार्यालयात गेल्या महिन्याभरापासून नवी कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च यामध्ये बचत होईल, तसेच पारदर्शकतेमध्ये अडथळे येणार नाहीत. नागरिकांनी स्वतःच माहिती भरायची असल्याने अडथळे दूर होतील.
- अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

