दिव्यांग बालकांवर उपचारांसाठी स्वतंत्र थेरेपी
जागतिक दिव्यांग दिन विशेष
पिंपरी, ता. २ : महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन’मध्ये आता शून्य ते सहा वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी अत्याधुनिक थेरेपी सत्रांना प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत तीन वर्षांवरील मुलांच्याच थेरेपीची सुविधा उपलब्ध होती. मात्र, आता नवजात ते सहा वर्षांदरम्यान दिव्यंगत्व ओळखणे आणि तत्काळ हस्तक्षेप (स्क्रीनिंग-रेफरल-अर्ली इंटरव्हेन्शन) अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
दिव्यंगत्वाचे लवकर निदान झाल्यास मुलांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी करता येते. परंतु अनेक पालकांना नवजात मुलांमधील शारीरिक किंवा मानसिक विकासातील त्रुटी ओळखता येत नाहीत. त्याचबरोबर नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्वही अनेकदा पालकांना माहिती नसते. परिणामी, दिव्यंगत्व ओळखण्यास उशीर होतो आणि मुलांच्या विकासप्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. हीच उणीव भरून काढण्यासाठी महापालिकेने या योजनेद्वारे बालकांच्या आरोग्य तपासणी ते थेरेपीपर्यंतची व्यवस्था उभारली आहे.
महापालिकेने या उद्देशासाठी मोठा कर्मचारी वर्ग तयार केला आहे. आशा कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येकी ४० आशाताईंच्या गटांचे प्रशिक्षण सुरू आहे. दिव्यंगत्व लवकर ओळखता यावे आणि योग्य वेळेत त्यांना थेरपी व आवश्यक उपचार मिळावेत यासाठी आशाताईंकडून घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. या बालकांना शक्य तितके स्वावलंबी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- या समस्यांवर होणार उपचार
शारीरिक विकासातील अडथळे
मानसिक किंवा बौद्धिक विकासातील त्रुटी
भाषा-विकासातील अडचणी
वर्तनात्मक समस्या
हालचालींमध्ये असमतोल किंवा कमजोरी
सुविधांमुळे पालकांनाही दिलासा
दिव्यांग भवन ही केवळ थेरेपी सुविधा नसून दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उभारलेला एक सर्वसमावेशक केंद्र आहे. येथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सायकोलॉजी, विशेष शिक्षण आणि दिव्यांगांसाठी आवश्यक मार्गदर्शन अशा सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आता नव्या योजनेत बालकांचाही समावेश झाल्याने पालकांसाठी मोठा दिलासा निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे लवकर निदान-लवकर हस्तक्षेप या तत्त्वाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत आहे. शहरातील दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. दिव्यांगांची बालपणातच ओळख होणार आहे. त्यामुळे योग्य वयात त्यांचे दिव्यंगत्व जाऊन स्वावलंबी होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाजविकास विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

