सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

भोंडवे चौक-मुकाई चौक रस्त्याची दुरवस्था
रावेतमधील सेक्टर ३२ मधील भोंडवे चौकातून मुकाई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बरेच लहान मोठे खड्डे पडले आहेत. फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यवसाय थाटले आहेत. तेथून संत तुकाराम महाराज पूल चौकाच्या सिग्नलपर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दुचाकीचालकांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. हा रस्ता वर्दळीचा आहे. येथील सिग्नल बंद होण्यापूर्वीच गाडी पुढे नेण्याची घाई चालकांना असते. खड्ड्यांमुळे वाहतूक आणखी संथ होते. यामुळे महानगरपालिका पथविभागाने वर्दळीच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, ही विनंती.
- विलास खरे, रावेत
PNE25V72891

अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीत अडथळे
एम्पायर इस्टेट चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता अरुंद आहे. सायंकाळी वाहतुकीत अडचणी येतात. या रस्त्यावर वाहनांचे पार्किंग आणि पदपथासाठी कामाची आखणी करण्यात आली आहे. मुळात जागा कमी असताना पार्किंग का केले जात आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच समस्या चिंचवडगाव मोरया हॉस्पिटल जवळदेखील आहे.
- एक नागरिक, चिंचवड
PNE25V72894

म्हाडा-मोरवाडी कॉलनीत पाइपलाइन फुटली
म्हाडा कॉलनी मोरवाडी परिसरात पाणीपुरवठा करणारी महापालिकेची पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय झाला. ही घटना पिंपरी चिंचवड पोलिस खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत आम्ही ‘सारथी’ प्रणालीवर तक्रार नोंदवून सकाळी संबंधित पाणीपुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यावर त्यांनी ‘‘पाणीपुरवठा सुरू असल्याने काम करणे शक्य नाही. तो बंद झाल्यानंतर पाइपलाइनचे काम करून घेऊ,’’ असे सांगितले. या प्रकारामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पाणीपुरवठा विभागाने योग्य ती काळजी घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी आमची मागणी आहे.
- एक वाचक
PNE25V72893

क्रीडा संकुलासमोर झाडे लावावीत
चऱ्होली बु. येथील वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलासमोरील रस्ता महत्त्वाचा व नेहमी वर्दळीचा आहे. त्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये सध्या झाडे नाहीत. त्यामुळे परिसरात धूळ, उष्णता आणि प्रदूषण वाढते. त्या अनुषंगाने, पर्यावरण रक्षण व परिसर सुशोभीकरणाच्या दृष्टीने त्या डिव्हायडरमध्ये शोभेची व छायादार झाडे लावण्यात यावीत. तसेच त्यांची निगा राखण्यासाठी नियमित पाणी द्यावे. देखभाल करण्यात यावी. या संदर्भात खालील बाबी विचारात घ्याव्यात. हा रस्ता वर्दळीचा असून, दुभाजकात झाडे नसल्यामुळे परिसराचे सौंदर्य कमी झाले आहे. वृक्षारोपण केल्यास परिसराचे सौंदर्य वाढेल आणि पर्यावरणास हातभार लागेल. ही झाडे धूळ आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत करतील.
- निर्गुण थोरे, चऱ्होली

PNE25V72889

कै. संतोष श्रीपाद किलोस्कर चौक, गंगानगर सेक्टर क्रमांक २८ निगडी प्राधिकरण येथील कै. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयासमोर ‘‘सावधान पुढे शाळा आहे. वाहने सावकाश चालवा’’ अशा सूचनेचा फलक दिसत नाही. शहरातील बऱ्याच शाळांसमोर अशा फलकावरील अक्षरे पुसट झाली आहेत. त्यामुळे ते दिसत नाही. त्यामुळे तेथे लवकरात लवकर योग्य फलक लावावेत.
- सिराज शेख, निगडी
PNE25V72890

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com