एकीकडे हळहळ, दुसरीकडे संताप

एकीकडे हळहळ, दुसरीकडे संताप

Published on

पिंपरी, ता. २ ः हिंजवडी आयटी पार्कमधील अपघातामध्ये सोमवारी (ता. १) आणखी तीन निष्पाप जीव गेले. एकाच कुटुंबातील सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे आयटीयन्सनी एकीकडे हळहळ आणि दुसरीकडे तीव्र संताप आणि चीड व्यक्त केली आहे.
अनेकांनी शहरातील खराब रस्ते, बेशिस्त वाहतूक, बेदरकारपणे चालविली जाणारी अवजड वाहने, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास या मुद्द्यांवरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्यांची रखडलेली कामे, गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेले आरएमसी प्लांट, त्यामुळे वाढलेले प्रदूषण, पावसाळ्यात साचणारे पाणी अशा एक ना अनेक समस्यांनी हिंजवडी, माण आणि या परिसरातील नागरिक तसेच आयटीयन्स त्रस्त झाले आहेत.
नेत्यांचे दौरे व बैठका होऊनही प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे प्रश्‍न सुटत नसल्याचा आरोप आधीपासूनच केला जात होता. आता हे प्रश्‍न सुटण्याऐवजी जटिल बनत आहेत. गेल्या काही महिन्यांत अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी गेलेली व्यक्ती सायंकाळी घरी येईल की नाही, अशी भीती कुटुंबाला वाटत असल्याचे अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
---

गेल्या काही महिन्यांत हिंजवडी, माणमधील प्रत्येक रस्‍त्यावर अपघात झाले आहेत. येथील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे यथे येणारे नागरिक भयग्रस्त झाले आहेत. अपघाताच्या भीतीमुळे अनेक जण दुचाकी चालवणे बंद करून चारचाकीला प्राधान्य देत आहेत, मात्र प्रत्येकालाच हे शक्य नाही. प्रशासनाने चालकांवरील निर्बंधांची कठोर अंमलबजावणी आणि चुकीबाबत कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे.

- गौरव सिसोदिया, आयटी कर्मचारी

विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, अतिवेगात गाड्या चालवणे हे हिंजवडीतील नेहमीचे चित्र आहे. यामध्ये स्कूल व्हॅनचाही समावेश आहे. हे सामान्य नागरिकांच्या डोळ्यादेखत घडत असेल तर प्रशासनाला दिसत नाही का ? नेहमी अपघात घेतल्यानंतरच का पावले टाकली जातात ? बेशिस्तांवर कारवाईचा बडगा उगारला तरच अपघातांना आळा बसेल. कारवाई करण्यापासून प्रशासनाला कोण रोखत आहे ? सर्वसामान्य नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का ?

- एक महिला आयटी अभियंता

मी आजच दोहलर कंपनीजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात पाहिला. किरकोळ अपघात असल्याने त्याची कुठेही नोंद होणार नाही. हिंडवडीमध्ये गेल्या काही महिन्यांत कितीतरी निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागला आहे. किरकोळ अपघातात जखमी झालेल्यांची संख्या तर बरीच मोठी असेल. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे हाच मार्ग राहील.
- नरेश सोनावणे, हिंजवडी फेज ३
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com