वाहन चालवताना वेगावर ठेवा नियंत्रण
वेगमर्यादा पाळा; धोका टाळा
अपघातांची वाढती भिती; १,९६३ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. २ : वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्यास अपघाताचा धोका वाढतो. भरधाव, बेदरकारपणे वाहन चालविल्याने मागील काही दिवसांत शहरात पाठोपाठ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये गंभीर जखमी होण्यासह काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एक हजार ९६३ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी या वर्षभरात कारवाई केली आहे.
रात्रीच्या वेळी तसेच मोकळ्या रस्त्यांवर अनेक वाहनचालक वेगमर्यादा न पाळता धोकादायक पद्धतीने वाहन चालवितात. अचानक ब्रेक लागणे, वाहनांवरचा ताबा सुटणे आणि पुढील वाहनाशी होणारी धडक या कारणांनी गंभीर अपघात घडत आहेत.
---------------------
सुरक्षितता
- वेग जितका कमी असेल तितकी अपघाताची शक्यता कमी होते
- गंभीर दुखापत किंवा मृत्यूची शक्यता कमी होते
- वेगमर्यादेमुळे चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवण्यास आणि अनपेक्षित परिस्थितींना प्रतिसाद देण्यास मदत
- स्वतःसह इतरही सुरक्षित राहतात
धोका
- वेग जास्त असल्यास वाहन सुरक्षितपणे थांबविण्यासाठी आवश्यक असलेले अंतर वाढते, ज्यामुळे धोक्याच्या वेळी वाहन थांबवणे कठीण होते
- वेगाने गाडी चालविताना चालकाला धोक्याची जाणीव होऊन त्यावर प्रतिक्रिया देण्यास कमी वेळ मिळतो
- अति वेगाने वाहन चालविल्यास रस्त्यावरील इतर नागरिक, पादचारी आणि सहप्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होतो
- वेगमर्यादा ओलांडल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन होते, ज्यामुळे दंड, शिक्षा होऊ शकते
---------------------
नागरिकांनी जबाबदार वाहनचालक म्हणून वर्तन करावे, अतिवेग हा क्षणिक आनंद आहे, पण त्याचे गंभीर परिणाम स्वतःसह समोरच्या व्यक्तीला भोगावे लागतात. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असते. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- सतीश नांदुरकर, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
वर्षभरात केलेली कारवाई
महिना ः कारवाई
जानेवारी ः १९५
फेब्रुवारी ः १८६
मार्च ः ३५१
एप्रिल ः १६३
मे ः १०१
जून ः ९३
जुलै ः २१६
ऑगस्ट ः १६१
सप्टेंबर ः १९२
ऑक्टोबर ः १३४
नोव्हेंबर ः १७१
-----------------
एकूण ः १९६३
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

