अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर ‘पीएमपी’चा कारभार

अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर ‘पीएमपी’चा कारभार

Published on

पिंपरी, ता. ४ : पुणे महानगर परिवहन महामंडळामधून (पीएमपीएमएल) लिपिक पदाच्या तब्बल ३९० जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्षे ही पदे भरली नसल्यामुळे पीएमपीएमएलच्या अंतर्गत कामकाजाबरोबरच प्रवासी सेवेवरदेखील विपरीत परिणाम होत आहे. प्रशासन या रिक्त जागा कधी भरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पीएमपीएमएलचे स्वारगेट मुख्यालय, पिंपरी मुख्यालय क्र. २ (लोखंडे भवन) आणि १७ आगार आहेत. प्रशासनात अंतर्गत कामकाजासाठी वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ अधीक्षक, सहायक अधीक्षक, मुख्य वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, नियंत्रक आणि तपासणीस, मुख्य तंत्रज्ञ, फिटर, हेल्पर, क्लिनर अशी विविध कार्यालयीन पदे आहेत. अशा विविध पदांवर सुमारे दोन हजार ३०० कर्मचारी काम करतात. तर, दरवर्षी साधारण २०० ते २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, नवी भरती प्रक्रिया होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. फेब्रुवारीपर्यंत ठेकेदाराच्या बसवर चालक ठेकेदाराचा आणि वाहक ‘पीएमपीएमएल’चा असायचा. मात्र, फेब्रुवारीमध्ये प्रशासनाने नवीन ४०० बसवर चालकांबरोबरच वाहकही ठेकेदारांचे नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कार्यालयीन कर्मचारी वगळता इतर सर्वच कर्मचारी ‘आउटसोर्ट’ केले जात असल्याचे दिसून येत आहे.

‘पीएमपी’चे कार्यक्षेत्र
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्द

३८१ : एकूण मार्ग
१,७७४ : दररोज धावणाऱ्या बस
१२७८ : ठेकेदारांच्या बस
२०१९ - एकूण बस

नव्या बस आल्यावर ताण वाढणार
‘पीएम-ई-ड्राइव्ह’अंतर्गत सहा महिन्यांत आणखी एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. तर, सीएनजीवरील १,२०० बसही दाखल होणार आहेत. त्यामुळे सध्याचे डेपो अपुरे पडणार आहेत. आणखी पाच ते सात डेपो वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, सध्याच्या डेपोंमध्येच कर्मचारी संख्या कमी आहे. आता नवीन ठिकाणी कर्मचारी कसे आणणार, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.

जागा ५१०, कर्मचारी १२०
लिपिक पदांच्या आकृतीबंधानुसार ५१० जागा मंजूर असताना केवळ सुमारे १२० लिपिक काम करत आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. चा प्रवासी सेवेवर देखील परिणाम होत आहे.

पीएमपीएमएलमधील चालक, वाहक आणि वर्कशॉपमधील कामगारांना बढती देऊन रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती करावी. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे नव्या नियुक् लवकरात लवकर व्हाव्यात.
- सुनील नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com