डॉ. कल्याण वाघ यांना 
शिक्षक रत्न पुरस्कार

डॉ. कल्याण वाघ यांना शिक्षक रत्न पुरस्कार

Published on

पिंपरी, ता. ५ ः संविधान अमृत वर्षानिमित्त वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयातील सहशिक्षक डॉ. कल्याण वाघ यांना या वर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अखंडपणे कार्य करणाऱ्या व समाजात शांतता, न्याय, समता व बंधुता प्रस्थापित व्हावी या कार्य सेवेबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार डॉ. वाघ यांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com