आकुर्डीतील अपघातातील
एका जखमीची प्रकृती गंभीर

आकुर्डीतील अपघातातील एका जखमीची प्रकृती गंभीर

Published on

पिंपरी, ता. ५ : आकुर्डीतील रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना भरधाव मोटारीने धडक दिल्याने दहा जण जखमी झाले. यातील एका व्यक्तीची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. सोमवारी (ता. १) रात्री साडे दहाच्या सुमारास खंडोबामाळ परिसरात हा अपघात झाला. यातील किशोर दिनकरराव माने (वय ५२, रा. पूर्णानगर, चिखली) यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार देवबा थोरात यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटार चालक राहुल रामदास घोडे (रा. मोहननगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी, माने यांच्यासह अन्य आठ जण रस्त्यालगत थांबलेले होते. त्याचवेळी आरोपीच्या भरधाव मोटारीची त्यांना धडक बसली. माने यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीराम कुलकर्णी यांच्या बरगडीला दुखापत झाली. इतर लोक किरकोळ जखमी झाले.
---------------------

Marathi News Esakal
www.esakal.com