पिंपरी-चिंचवड
वाचक लिहीतात
रुग्णालयांचा निष्काळजीपणा
‘सकाळ’ मध्ये ‘उपचाराअभावी प्रिया प्रसादचा मृत्यू, नागरिकांची प्रशासनावर सरबत्ती’ हे वृत्त वाचले. औंध येथील जिल्हा रुग्णालयातील न्यूरोसर्जन उपचार मिळाले असते तर देवा प्रसाद यांची थोरली कन्या वाचली असती, तिला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सुद्धा दाखल करता आले नाही, पुणे जिल्ह्यातील अव्वल ससून रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला असता तिचा मृत्यू झाला. राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यांनी सूचना प्रसारित केली आहे की, प्रत्येक रुग्णालयात सूचना फलक लावण्यात आले पाहिजेत. रुग्णालय खासगी असो की सरकारी उपचार प्रक्रिया, तज्ज्ञ, औषध दर ही सूचना जाहीर करण्यात आली पाहिजे.
-विजय निकाळजे, निगडी

