डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पिंपरी, ता. ६ ः महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यात आले. यानिमित्त संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम झाले. अनुयायांनी भाषणे, काव्य आणि चारोळ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
मराठा सेवा संघ
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, मुक्ताई बचत गट, ऑल इंडिया सलमान-ए-जमात आदी संघटनांच्या वतीने ॲड. सुनीता रानवडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुमन आवळे, ॲड. अपूर्वा काटे व शकुंतला कनोजिया उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रूपनर, दिलीप वाघ, ॲड. सुनील रानवडे, चेतन कांबळे, जमील भाई शेख, मुन्ना शेख, चांद भाई शेख, सुरेश इंगळे, ॲड लक्ष्मण रानवडे, राजू आवळे आदींनी आयोजन केले.
संघवी केशरी महाविद्यालय
संघवी केशरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धिरज शाखापुरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या उपयुक्ततेबाबत त्यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाने प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा दिली. डॉ. आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समतेचे अग्रणी होते.’’ डॉ. संतोष काशीद यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.अभिषेक आकणकर यांनी आभार मानले.
टागोर शिक्षण संस्था
इंद्रायणीनगर येथील टागोर शिक्षण संस्था आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष काळे, श्री स्वामी समर्थ माध्यमिकचे पर्यवेक्षक एस. टी. गुरव, डी. डी. मुल्ला, सुलोचना पाटील, माया पाटोळे, बी. ई. कदम, एस. एम. तोरणे, दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. रोहन शेगोकार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शरद तोरणे यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब यांच्या संघर्षातून मिळणारी शिकवण मोलाची आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे समाजाला दिशा मिळाली.’’ एस. बी. कोळेकर, प्रकाश पाखरे, रवी खंदारे, बी. के. असवले यांनी आयोजन केले.
गोलांडे प्राथमिक विद्यालय
कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्वला चौधरी व ज्येष्ठ शिक्षिका लता डेरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. असलम अली शेख यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब यांचा सामाजिक व आर्थिक संघर्ष, समाजासाठी दिलेले योगदान तसेच देशासाठी केलेले अनमोल कार्याची याची माहिती दिली.
झोपडपट्टी सुरक्षा दल
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, राज्य संघटक नाना थोरात, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वैशाली अवघडे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, शहर अध्यक्ष अर्जुन दाखले, विलास थोरात, गोविंद भोसले, उत्तम सकटे, भारत चोपडे, रामप्पा शिंदे, अरुण अवघडे, आनंद जाधव, अनिकेत घुमे, नितीन मोरे, भारत मोरे, संतोष देढे, अरुण भोसले, किसन सुरवसे, संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
निंबारकर विद्यालय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या मातोश्री ताराबाई भीमाजी निंबारकर पूर्व प्राथमिक विद्यालयात जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे कार्यक्रम झाला. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संस्थेचे उपाध्यक्ष ए. जी. नगरकर, जयश्री निंबारकर, शाहीर आसाराम कसबे, प्रा. किरण इंगोले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी भाषणे केली. उपशिक्षक गजानन शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्राथमिकचे मुख्याध्यापक आयुष्य निंबारकर, मुख्याध्यापिका स्नेहल पारखे
यांनी नियोजन केले. धनंजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. गणेश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत जगदाळे यांनी आभार मानले.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पिंपरीतील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानिमित्त सेवा दलाचे अध्यक्ष किरण खाजेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष सोमनाथ शेळके, शिस्त पालन अध्यक्ष अबू बकर, विशाल कसबे, भीमराव जाधव, दीपक भंडारी, मिलिंद फरतडे, विठ्ठल शिंदे, अनुसूचित जाती विभागाचे सचिव पोपट आरणे, डॉ. मनिषा गरुड उपस्थित होते.
पुनावळे शाळा
श्रीमती अनुसाई ओव्हाळ विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमापूजन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, सचिव विश्वास ओव्हाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी आदी यावेळी उपस्थित होते. नववीच्या विद्यार्थ्यांनी भीम स्तुतीगीत व एक नाटिका सादर केली. आशा पोटभरे, सना शेख, श्रुती खानजोडे, स्वप्नील जाधव, सोनाक्षी डोंगरे, वैष्णवी गाडगे, धीरज बगलवाड, विभा पारडे, प्रज्वल चंदनशिवे यक्ष वाघमारे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी शिक्षक दीपक नेवाळे, योगेश ढावरे, रिझवाना सय्यद, उषा केसकर, दत्तात्रेय खैरनार, वनिता गायधने उपस्थित होते. विद्या गजभाने यांनी सूत्रसंचालन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

