सकाळ संवाद
सकाळ संवाद
चिंचवडमधील विवेक वसाहतीजवळील भक्ती रेसिडेन्सी परिसरात कचरा व राडारोड्याचे ढीग कित्येक महिन्यांपासून पडून आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने हा परिसर तातडीने स्वच्छ करावा.
- प्रकाश निलाखे, चिंचवड
E25V74646
दापोडीमधील एसएमएस कॉलनी लाईन क्रमांक एक येथील परिसर जवळपास अंधारात आहे. विजेचे काही दिवे तीन महिन्यांपासून बंद आहेत. इतर दिव्यांचा उजेड फार कमी पडतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. यापूर्वी वायर किंवा आवश्यक साहित्य नाही म्हणून ही कामे करता येत नसल्याची सबब पुढे करण्यात आली होती. अंधारामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. येथून चालताना कुणीही अडखळून पडण्याचीही शक्यता आहे. चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब दुरुस्त करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
- अकिल अहमद शेख, दापोडी
PNE25V74647
चिंचवड येथील लिंक रोडवर डॉमिनोज पिझ्झा परिसरात पदपथावर विद्युत केबल उघड्यावर पडली आहे. हे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने हे काम तातडीने पूर्ण करावे.
- प्रदीप लवाटे, चिंचवड
PNE25V74645
निगडीच्या हुतात्मा चौकात स्मार्ट सिटीच्या नावाखाली केलेल्या बदलांमुळे एकेकाळचा मोठा रस्ता आणि चौक फारच अरुंद झाला आहे. एक मोटारही नीट जाऊ शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन असेच प्रकल्प पुढे रेटणार असेल तर येत्या १०-१५ वर्षांत आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोकसंख्येप्रमाणेच वाहतूकही वाढेल. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करण्याची गरड आहे. अन्यथा संपूर्ण शहर वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले असेल.
-एक वाचक
PNE25V74648
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

