सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

भटक्या श्‍वानांचा त्रास
मोशी ः आविष्कार सोसायटी येथील बोराटे वस्ती परिसरात भटक्या श्‍वानांच्या त्रासामुळे लहान मुले, महिला यांना रस्त्याने चालताना अडचण होते. तसेच हे श्‍वान रात्रीच्या वेळी कामावरून येणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात. महापालिका प्रशासनाने या श्‍वानांचा वेळीच योग्य तो बंदोबस्त करावा.
- संतोष शिंगाडे, मोशी
NE25V75170

चेंबरचे झाकण दुरुस्त करावे
केशवनगर ः चिंचवड गावातून काळेवाडीला जाताना गणपती मंदिर परिसरातील पदपथावरील चेंबरचे झाकण खचले आहे. या परिसरात आत्तापर्यंत चार-पाच किरकोळ अपघात झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने मोठा अपघात होण्यापूर्वी या चेंबरचे झाकण दुरुस्त करावे.
- रमेश देव, चिंचवड, केशवनगर
PNE25V75171

खचलेल्या पदपथामुळे नागरिक त्रस्त
रावेत ः महापालिकेतील जनसंवाद या कार्यक्रमांतर्गत सेक्टर २९ रावेत मधील स्टेट बँक व प्रगती पॅलेस दुकानासमोरील खचलेला पदपथ दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या पदपथावरील दुकानाचे ग्राहक पदपथावर उभे राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना येथून चालताना अडचण होते. तक्रार केली असता अधिकारी पाहणी करून जातात, परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- हिरामण रामटेके, रावेत
PNE25V75168

पदपथावरील लोखंडी केबिन हटवावीत
नवी सांगवी ः सांगवी फाटा येथे खुले व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे, तसेच शौचालय, टेबल टेनिस कोर्ट बसण्यासाठी बाकडे आदी कामे करण्यात आली आहेत. ही कामे संपली आहेत तरी ठेकेदाराने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठीची लोखंडी केबिन पदपथावर तसेच ठेवले आहेत. वारंवार तक्रार करूनही ठेकेदार केबिन नेण्यास तयार नाही.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V75169

Marathi News Esakal
www.esakal.com