क्राइमच्या बातम्या
पिस्तूल बाळगणाऱ्या पाच जणांवर गुन्हे
पिंपरी : परवाना नसतानाही पिस्तूल बाळगणाऱ्या पाच जणांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोई रोडवरील महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राजकुमार चव्हाण (वय १९, रा. चाकण) याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस पोलिसांना आढळले. पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपीने स्वप्नील पाटील (रा.चाकण) याच्याकडून पिस्तूल घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार स्वप्नील याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या प्रकरणात डुडूळगाव येथील माउलीनगर परिसरात आरोपी रितेश भोसले (वय २६, रा. मोशी) यांच्याजवळ देशी बनावटीचा कट्टा व दोन काडतूस आढळले. त्याला दिघी पोलिसांनी अटक केली. तर, अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात संत तुकारामनगर पोलिसांनी ६१ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व काडतूस बाळगल्याप्रकरणी आरोपी बिलाल रैसुद्दीन इनामदार (वय २७, रा. दत्त मंदिररोड, वाकड) याला अटक केली. भोसरी पोलिसांना गावजत्रा मैदानात एका अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी त्याला समजपत्र दिले.
कर सल्लागाराने बुडविला १० लाखांचा जीएसटी
पिंपरी, ता. १० : जीएसटी भरण्यासाठी कर सल्लागारास दिलेल्या रकमेचा त्याने अपहार करत संस्थेची दहा लाखांची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश रावजी थोरात यांच्या कंपनीचा जीएसटी १० लाख २ हजार ७४९ रुपये होता. ही रक्कम भरण्यासाठी कर सल्लागार मिलिंद घाटे (वय ५५, रा. चिखली, मूळ नांदेड) यांस फिर्यादीने दिली. फर्मच्या खरेदी-विक्री बिलात फेरफार करून या रकमेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करत घाटे आणि एका महिलेने फिर्यादीची फसवणूक केली. त्यांच्याविरोधात भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगाराने पळविले आठ तोळे सोने
पिंपरी : दुचाकी उभी करून सराफा व्यापारी लघुशंकेसाठी गेला. त्यावेळी सोबतच्या कामगाराने ८० ग्रॅम २०० मिलीग्रॅम सोने लंपास केले. ही घटना भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गालगत घडली. फिर्यादी दर्शन जैन (वय २८, ज्वेलर्स, रा. कॅम्प, पुणे) यांनी आरोपी भैरुसिंग सोलंकी (वय २८, कामगार, रा. राजस्थान) याच्याविरोधात भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

