सुचना फलकासाठी मेट्रोकडून बीआरटी मार्ग बंद
पिंपरी, ता. १० ः पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडीत किझ् हॉटेलसमोर महामेट्रोकडून सूचना फलक लावण्यात येत आहे. यासाठी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून एम्पायर इस्टेट ते मोरवाडी चौक हा बीआरटी मार्ग बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या सर्व बस सेवा रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रो प्रशासनाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांना जलद प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीएमएल बससाठी पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान १२.५० किलोमीटर अंतराची स्वतंत्र बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गिका बांधण्यात आली. पण, गेल्या काही वर्षांपासून या मार्गिकेवरची सेवा विस्कळित झाली आहे. सुरुवातीला पिंपरी ते निगडी मेट्रो कामासाठी निगडीकडून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी बीआरची मार्ग उखडला आहे. तर दापोडी ते निगडीकडे जाणाऱ्या मार्गावर निगडी ते दापोडीपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी बीआरटी मार्ग खोदला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाची दोन्ही मार्गांवरची सेवा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळित झाली आहे. आता मोरवाडीत किझ् हॉटेलसमोर पुणे-मुंबई महामार्गावर सूचना फलक लावण्याचे काम सुरू केले आहे. पण, हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. याकामासाठी बीआरटी मार्ग बंद केला आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेटकडून पिंपरीकडे जाणाऱ्या सर्व बस सेवा रस्त्यावरून धावत आहेत. सेवा रस्त्यावर अनधिकृत पार्किंग आणि मेट्रो मार्गिकेमुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोडीं होत आहे. आता सर्व बस सेवा रस्त्यावरून धावत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
----------
मेट्रोचे सूचना फलक लावण्याचे काम सुरू असल्यामुळे बीआरटी मार्ग बंद आहे. हे काम लवकरात लवकर करण्याबाबत मेट्रो प्रशासनाशी चर्चा झाली आहे.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता
सूचना फलकाच्या कामाबाबत माहिती घेऊन ते काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील.
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

