एकवीस पदक विजेती स्वारा मुऱ्हेचा सत्कार
सोमाटणे, ता. १२ ः `एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत बारा वर्षांच्या स्वारा मुऱ्हेने यश मिळविल्याबद्दल साईबाबा सेवा धाम ट्रस्टतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. स्वाराला वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘अरेंजिय मार्शल आर्ट अॅंड स्पोर्ट फाउंडेशन मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले होते. सध्या ती सातवीत शिकत असून तीने वीस पदके मिळविले आहेत. नुकत्याच पेण येथे झालेल्या स्पर्धेत तीने एकविसावे पदक मिळवले असून कमी वयात ‘एल्बो बॉक्सिंग’मध्ये अधिक पदके मिळवणारी ती मावळातील एकमेव विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल ट्रस्टच्या वतीने बत्तीसाव्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून तिचा सत्कार ट्रस्टचे संस्थापक रोहन दर्यानानी यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक शंकरराव शेळके, सत्यम खांडगे, मधुश्री जोशी, निगाव पाटकर, आचर्या आर्मी आदी उपस्थित होते.
कान्हे ः स्वारा मुऱ्हे हिचा सत्कार करताना साईबाबा सेवा धाम ट्रस्टचे पदाधिकारी.
Smt10Sf1.

