

पिंपरी, ता. ११ ः ‘पुस्तकी शिक्षणासोबतच पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे,’ अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केली.
संभाजीनगर, चिंचवड येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, सी-मेट संस्थेतील प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे उपस्थित होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्रात परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ‘थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी विभागांच्या वतीने ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’ या विषयावर भूगोल विभागाच्या वतीने ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर ‘इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप’ या विषयावर ‘इतिहास आणि राज्यशास्त्र’ या विभागांच्या वतीने ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी’ या विषयावर शारीरिक शिक्षण, क्रीडा, मानसशास्त्र व ग्रंथालय या विभागांच्या वतीने ‘ए आय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’ या विषयावर आणि ‘बायो फ्युजन २०२५’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती दिली.
प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. प्रा. दत्तात्रेय हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आय आय टी मद्रास येथील प्रा. डॉ. बीरह बैरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा भरड, प्रा. गणेश भांगरे, प्रा. विजय वानखेडे, प्रा. पौर्णिमा केंगळे, प्रा. सिमरन मुलाणी, प्रा. काजल धुमाळ यांनी संयोजनात सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.