सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

धोकादायक झाकणांमुळे अपघाताची भीती
चिंचवड येथील चापेकर पुतळ्याच्या अलीकडे चेंबरच्या दोन झाकणामध्ये अंतर पडल्याने वाहनचालकांना त्वरित लक्षात येत नाही. त्यामुळे चाक त्यामध्ये अडकून वाहनचालक घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V76001

पदपथावरील दुचाकी हटवावी
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वारा या परिसरात मागील अनेक दिवसांपासून एक दुचाकी पदपथावर पडून आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालताना अडचण निर्माण होत आहे. संबंधित प्रशासनाने नागरिकांसाठी अडथळा ठरणारी ही दुचाकी पदपथावरून त्वरित हटवावी.
- एक वाचक, आकुर्डी
PNE25V75999

रस्ता असमान असल्याने अपघाताचा धोका
सृष्टी चौक ते गझेबो हॉटेल दरम्यान मस्जिद परिसरात सिमेंटचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या अगदी मधोमध खड्डे व भेगा पडून रस्ता असमान झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून पडतात व अपघात होतात. त्यामुळे प्रशासनाने हा संपूर्ण रस्ता व्यवस्थितरित्या खड्डे तडे भरून एकसमान करावा. हा रस्ता वर्दळीचा असल्याने येथे अनेक वेळा अपघात होतात. एखादी दुर्घटना होण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करावी.
-प्रमिता सोनवणे, पिंपळे गुरव
NE25V76002

काकडे पार्क जवळ कचरा, राडारोडा
चिंचवड येथील विवेक वसाहत परिसरातील काकडे पार्क जवळ राडारोडा व कचरा मागील दोन महिन्यांपासून तसाच पडून आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
- प्रकाश निलाखे, चिंचवड
PNE25V76000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com