पिंपरीतील कारवायांत
सहा जणांना अटक

पिंपरीतील कारवायांत सहा जणांना अटक

Published on

पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ पिस्तुले जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सात, तर गुन्‍हे शाखेच्या युनिट एकच्‍या पथकाने एक पिस्तूल जप्त केले.
गुंडा विरोधी पथकाने ताथवडे परिसरातून समीर लक्ष्मण इजगज (रा. मारुंजी, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीची दोन पिस्तुले व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. चिखलीतील सोनवणे वस्ती परिसरात ओमकार सिद्धेश्वर बंडगर (रा. उमरगा), अभय विकास सुरवसे (रा. पिंपळे गुरव), सुहास ऊर्फ पिल्या बालाजी गायकवाड (रा. घरकुल, चिखली, दोघे मूळ रा. धाराशिव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार पिस्तुले व तीन काडतुसे जप्त करण्यात आली. अभय सुरवसे दोन वर्षांसाठी तडीपार असूनही हद्दीत आल्याचे तपासात उघड झाले.
आळंदी-मरकळ रस्त्यावर केलेल्या कारवाईत धर्मेंद्र हरिप्रसाद सैन (रा. खेड, पुणे) याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट एकने काळेवाडी परिसरातील नढे कॉर्नरजवळील कारवाईत रोहित महादेव आगरखेड (रा. पवनानगर, काळेवाडी) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त केले.
-------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com