गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या
बहाण्याने ५९ लाखांना गंडा
पिंपरी : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचा बहाणा करून दोन व्यक्तींना ५९ लाख २५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. वाकडमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी अक्षय दीपक पंजाबी (रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संकेत बचुभाई मिस्त्री व रूपेश नारायण बारिया (दोघे रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र देवानंद अजवानी यांना आमिष दाखवले. त्यांना एंजिल वन कंपनीचे बनावट शेअर सर्टिफिकेट पाठवून पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी शेअर न देता त्यांनी फसवणूक केली.
------------------------
सिंगापूरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी : सिंगापूर येथे २७ हजार सिंगापूर डॉलर मासिक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आकुर्डीत एका व्यक्तीची १० लाख ४४ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गोकूळ हिम्मतराव गाजरे (रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तुषार कुमार, संजय बोसे, जितेश साहू, अनिल आदिवासी आणि इतरांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी ऑनलाइन माध्यमातून नोकरी शोधत होते. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. नोकरीचे आमिष दाखविल्यानंतर त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर पाठवले. पैसे घेऊनही त्यांना नोकरी मिळाली नाही.
--------------------------

ऑनलाइन ८० हजार, दुचाकीसह आरोपी पसार
पिंपरी : मोबाईल विक्री करणाऱ्या दुकान चालकाला रोख रक्कम देण्याच्या नावाखाली एका अनोळखी व्यक्तीने फसविले. ऑनलाइन ८० हजार रुपये तसेच दुचाकी घेऊन आरोपी फरार झाला. मोशी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी शहाबुद्दीन अलीमुद्दीन शाह (रा. चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी दुकानात असताना अनोळखी व्यक्ती तिथे आली. त्याने शाह यांना रोख रक्कम देऊन ऑनलाइन माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगितले. शाह यांनी ८० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने आरोपीने शाह यांना त्यांच्याच दुचाकीवरून एका एटीएम सेंटरपाशी नेले. शाह यांना उतरवून त्याने दुचाकी लावण्याचा बहाणा केला. काही क्षणांत तो दुचाकीसह पसार झाला.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com