शालेय जगत
शालेय जगत
मातोश्री ताराबाई निंबारकर पूर्व प्राथमिक शाळा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या मातोश्री ताराबाई निंबारकर पूर्व प्राथमिक सौ जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा हा त्यामागे उद्देश होता. फलक अनावरणाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे मेट्रोचे वरिष्ठ अभियंता सचिन आडागळे, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर, मुख्याध्यापिका स्नेहल पारखे उपस्थित होत्या. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रांगोळीतून विज्ञान आकृत्या काढल्या. व्यसनमुक्तीबाबत नाटिका व घोषवाक्य सादर करण्यात आली. ७४ प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले. प्रत्येक गटातून उत्कृष्ट प्रकल्पांचे क्रमांक काढण्यात आले. पूर्व प्राथमिक आनंद सुरवसे प्राथमिक गट क्रमांक १ प्रथम असद शेख, द्वितीय अनन्या काळबांडे, गट क्रमांक दोन प्रथम संस्कृती भालेराव, द्वितीय प्रणाली काळबांडे, गट क्रमांक तीन प्रथम रिया कोथळ, द्वितीय वर्षा धोत्रे, माध्यमिक विद्यालय प्रथम सुजल राठोड, द्वितीय आदिती गवळी, ऋतुजा गायकवाड रांगोळीतून प्रथम रेवती वेताळ करण भुसने. प्रास्ताविक शिक्षक गणेश वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. परीक्षक म्हणून शिक्षक धनंजय जगताप यांनी काम पाहिले.
श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर
आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक डॉ. गोविंद दाभाडे होते. आकुर्डी येथील राष्ट्रीय कुस्तीपटू राजेश काळभोर यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन तसेच मैदानाचे पूजन करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राजू माळे उपस्थित होते. डॉ. दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक विद्या रेडकर यांनी केले. निवेदन प्राजक्ता बंडगर यांनी केले. आभार सुवासिनी वैद्य यांनी मानले. योगेश पाटील, मंगेश अहिरे, अविनाश आखाडे, प्रकाश कोळप, अमोल गुंड इत्यादी शिक्षकांनी मैदान आखणी केली. योगेश पाटील यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. नयना पाटील, माधुरी सोनवणे, प्राजक्ता बंडगर, विद्या रेडकर, सीमा खेडकर, मनीषा चिंचवडे, प्रियांका वालकोळी आदी शिक्षकांनी पंच म्हणून गुणदान केले.
श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ईशस्तवन, नवकार महामंत्र, स्वागत गीत, गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्यक्ष ॲड. राजेंद्र मुथा, आनंदराम धोका, रमणलालजी शिंगवी, नवीनचंदजी लुंकड, प्रबोधनकार शारदा मुंडे, राजेंद्र धोकाजी उपस्थित होते. प्राचार्या सुनीता नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन व बक्षीस वितरण विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी केले. आभार संजीव वाखारे यांनी मानले.
प्रश्नोत्तरे स्पर्धेचे बक्षीस वितरण
मोहननगर, चिंचवड येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या सौ. जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेच्या अध्यक्षा जयश्री दिलीप निंबारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा माहितीवर आधारित प्रश्नोत्तरे स्पर्धा घेतली. या स्पर्धेत विद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट दहा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. अनम शेख, पूर्वी कुकडे (दोघी इयत्ता पाचवी), प्रीती कोथळ (इयत्ता आठवी), अर्पिता जमादार, शीतल शिंदे, सिद्धी मोरे, स्नेहल कोळी, वर्षा गुजले, तनुजा जावळे, पल्लवी दौंडकर (सर्व इयत्ता दहावी) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. शिक्षक धनंजय जगताप व पियुषा नागपुरे यांचा अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गीता मंदिर प्राथमिक शाळा
चिंचवडमधील गीता मंदिर प्राथमिक शाळेत वाचन महोत्सव साजरा करण्यात आला. शांतता! पुस्तके वाचूया! विश्वविक्रम करूया! या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक तास विविध विषयावरील पुस्तकांचे अवांतर वाचन केले. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजले व त्यांची वाचनातील गोडी वाढली. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
प. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय
‘शांतता... पुणेकर वाचत आहे’ या कार्यक्रमांतर्गत नेहरूनगर येथील प. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. कार्यक्रमास संस्था अध्यक्ष हनुमंतराव भोसले उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या वाळुंज यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. परिपाठ विभाग प्रमुख सविता महांगडे, सखाराम साबळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी वडघुले, अरमान पठाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहसचिव अनिलकुमार कांकरिया, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सुधाकरराव आव्हाड, शिवराज कदम- जहागीरदार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संपतराव गर्जे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेतील विविध उपक्रमांची माहिती पीपीटीव्दारे श्रद्धा कुलकर्णी यांनी दिली. प्रास्ताविक प्राचार्या सारंगा भारती यांनी केले. पाहुण्यांचे परिचय मनिषा लोखंडे यांनी केले. पूजा काळे यांनी तयार केलेल्या भरारी हस्तलिखिताचे विमोचन केले. संयोजन उपमुख्याध्यापिका सुषमा बंब व विभागप्रमुख सुचिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता धनवडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी मानले.
संचेती प्राथमिक विद्यालय
चिंचवड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संचेती प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका नेहा गुमते (देशमाने) यांचा ‘शिक्षक विभागात प्रथम क्रमांक आला. पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विज्ञान प्रश्नमंजूषा या स्पर्धेत संचेती प्राथमिक विद्यालयातील यशराज चव्हाण व साईराज मोहोरकर या विद्यार्थ्यांचा ‘तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे. या विजेत्यांना शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, सचिव वर्षा टाटिया, उपाध्यक्ष आदित्य टाटिया आणि संचालिका ऐश्वर्या बेदमुथा, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
प. वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय
नेहरू नगर येथील प. वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयात बाल आनंद बाजार झाला. संस्था अध्यक्ष हनुमंतराव भोसले यांनी बाल आनंद बाजाराचे उद्घाटन केले. मुख्याध्यापिका संध्या वाळूंज यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमात इयत्ता ५ ते १०वीतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, खेळण्यांचे स्टॉल, कला–हस्तकला वस्तू आणि खेळ असे अनेक स्टॉल्स लावले. व्यवहार आणि व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले. जयश्री यादव, अरमान पठाण यांनी नियोजन केले. सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
मॉडर्न प्राथमिक शाळा
यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. महोत्सवाचे उद्घाटन हॉकी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले गणेश पालांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य व शाळेचे प्र मुख्याध्यापक प्रमोद शिंदे, शिशू विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता घुले, मॉडर्न प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा शारदा हागे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा पूनम वाघ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडाविभागाचे प्रमुख कैलास माळी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी प्रास्ताविक केले. संयोजन नरेश कांबळे, किरण वारके, भारती साळुंके, रोहिणी माने, शीतल गव्हाणे, दत्ता मोरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

