अपर पोलिस आयुक्तपदी बसवराज तेली
पिंपरी, ता. १५ : गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक बसवराज तेली यांची बदली करून त्यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यासाठी पोलिस उपायुक्त हे पद उन्नत केले आहे. तसेच गणेश इंगळे व प्रदीप जाधव यांची पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
गणेश इंगळे हे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे येथे पोलिस उपायुक्त, तर प्रदीप इंगळे हे गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती येथे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच सत्यजित आदमने यांचीही सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे पोलिस अधीक्षकपदी कार्यरत होते.
सहायक पोलिस आयुक्तांना नेमणुका
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्याच्या सहायक पोलिस आयुक्त विभागाची पुनर्रचना करून हिंजवडी व महाळुंगे एमआयडीसी विभाग नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे सहायक पोलिस आयुक्ताच्या संरचनेत बदल झाला आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (ता.१५) दिले.
सहायक पोलिस आयुक्त विभाग अंतर्गत येणारे पोलिस ठाणे अधिकारी
पिंपरी निगडी, चिंचवड, पिंपरी विठ्ठल कुबडे
सांगवी संत तुकाराम नगर, दापोडी, सांगवी सचिन हिरे
हिंजवडी हिंजवडी, बावधन बाळासाहेब कोपनर
वाकड रावेत, वाकड, काळेवाडी सुनील कुऱ्हाडे
भोसरी एमआयडीसी एमआयडीसी भोसरी, भोसरी, दिघी सुधाकर यादव
चाकण चाकण उत्तर, चाकण दक्षिण, आळंदी सचिन कदम
देहूरोड शिरगाव, देहूरोड, चिखली बाळासाहेब कोपनर
महाळुंगे एमआयडीसी तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी सचिन कदम
उत्तर महाळुंगे, दक्षिण महाळुंगे
नवीन पोलिस ठाण्यांना पोलिस निरीक्षक
चाकण, आळंदी पोलिस ठाणे व महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांचे विभाजन करून चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे व या दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली आहे. या नवीन ठाण्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकही मिळाले आहेत. ते पुढीलप्रमाणे विजय ढमाळ - महाळुंगे दक्षिण, दिगंबर सूर्यवंशी - उत्तर महाळुंगे, जितेंद्र कदम - उत्तर चाकण, संजय सोळुंके - दक्षिण चाकण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

