प्रभाग नऊमध्ये यंदाची निवडणूक रंजक
पिंपरी, ता.१६ : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात मासुळकर कॉलनी-प्रभाग नऊमध्ये अनेक नवीन इच्छुक चेहऱ्यांनी ‘बॅनरबाजी’ करत प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. या प्रभागात एका माजी नगरसेवकाच्या घरात चुलत भाऊ-भाऊ आणि जाऊबाई एकमेकींविरूद्ध लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रभागात यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्साह वाढला आहे. माजी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या वेळीही चार उमेदवारांचे पॅनेल असणार आहे. म्हणजेच एका प्रभागात ‘अ’,‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा जागा असतील. महापालिकेत यापूर्वी निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुतेकांनी पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा ‘होम ग्राउंड’ असलेला प्रभागावर वर्चस्व गाजविण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत.
बॅनरवर सौभाग्यवतीचेही फोटो
शहरात मासुळकर कॉलनी हा सर्वाधिक मोठा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागाकडे कायमच सगळ्यांचे लक्ष असते. उच्चभ्रू सोसायटीधारक आणि झोपडपट्टीधारकांचा अशी या प्रभागाची रचना आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह शिवसेना व शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्पर्धा आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. सर्वच इच्छुकांनी आपल्या सोबत सौभाग्यवतीचेही फोटो बॅनरवर झळकावले आहेत.
इच्छुकांमध्ये अनेकांची नावे
इच्छुकांमध्ये माजी नगरसेवक राजेश पिल्ले, समीर मासुळकर, राहुल भोसले, कैलास कदम, सद्गुरू कदम, विशाल मासुळकर, सारिका मासुळकर, शीतल मासुळकर, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, डॉ. वैशाली घोडेकर, डॉ. मनीषा गरूड, वैशाली खाड्ये, फारुख इनामदार, संजय मंगोडेकर, ॲड. उमेश खंदारे, धम्मराज साळवे, वीणा सोनवलकर, संतोष चांदेरे, रुपेश चांदेरे, कांचन वाघमारे, मुमताज शेख, सचिन शिंदे, आशा काळे, परीक्षित वाघमारे, कमलेश वाळके, इमरान शेख अशी इच्छुकांची संख्या वाढत असतानाच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे हे देखील नशीब आजमावत आहेत. तर, ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे.
काहींना फायदा; काहींना तोटा
निवडणुकीतील चार सदस्यीय पद्धतीमुळे काहींना फायदा; तर काहींना तोटा होणार असल्याचे बोलले जाते. सामाजिक उपक्रम, नवीन चेहरा किंवा चांगला जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी पार्श्वभूमी तयार असते. पण, त्याच्या सोबतीला एखादा मतदारांच्या पसंतीचा नसलेला उमेदवार दिला; तर विजयी होणारा उमेदवार दुसऱ्यामुळे पराभूत होऊ शकतो. त्यामुळे एकामुळे दुसऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे उमेदवार निवडण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

