सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सकाळ संवाद
कुणाल आयकॉन रस्त्यावर कोंडी
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर चार महिन्यांपासून रस्ते दुरुस्ती, पाइपलाइन टाकणे इत्यादी कामे सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. सोसायटीत वळताना सुद्धा १० मिनिटे वेळ जातो. या कामामुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण रस्त्याचा फक्त अर्धा भाग सध्या वापरात आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यात संपूर्ण पदपथ हा पथारीवाल्यांच्या हातगाड्यांनी व्यापून गेला आहे. त्यामुळे चालणे अवघड झाले आहे. तरी संबंधित अधिकारी वर्गाने या गोष्टीची तातडीने दखल घेऊन मार्ग काढावा व स्थानिकांना दिलासा द्यावा.
-चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
76907


वाढलेल्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका
पुणे-आळंदी रस्त्यावरील बालाजी मंदिर शेजारील ''द डोसा स्पॉट'' आणि ''साईबा अमृततुल्य'' या दुकानांसमोर सेवा रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या फांद्या सेवा रस्त्यावर आणि रस्त्यालगत खाली झुकल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः, दुचाकी आणि मोठ्या वाहनांना या फांद्यांचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढलेल्या फांद्यांमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या धोकादायक स्थितीची नोंद घेऊन, संबंधित विभागामार्फत तातडीने पाहणी करून अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, सदर झाडांच्या धोकादायक फांद्या त्वरित छाटण्याची व्यवस्था करावी.
-निर्गुण थोरे, आळंदी रोड
PNE25V76908


जिजाऊ उद्यान खेळणी दुरुस्त करा
राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासॉर गार्डन) पिंपळे गुरव, येथील लहान मुलांसाठी असलेली खेळणी व व्यायामाच्या साहित्याची दुरवस्था झाली असून दुखापत होण्याची शक्यता आहे. उद्यान विभाग, महापालिकेने लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
-प्रतिभा ओव्हाळ, सुदर्शननगर, पिंपळे गुरव
PNE25V76906


पिंगळे रस्त्याचे डांबरीकरण करावे
पिंगळे रोड- राधानंद स्वामी मठ ते होंडा विंग्ज शोरुमपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण रखडलेले आहे. गेल्या वर्षभरापूर्वी हा रस्ता ड्रेनेज कामासाठी खोदला गेला होता. ड्रेनेज कामाच्या आधी रस्ता अतिशय चांगल्याप्रकारच्या डांबरीकरणाचा होता. ड्रेनेज काम पूर्ण होऊन बरेच महिने झाले. परंतु, त्यावर बारीक खडी टाकून तात्पुरता रस्ता केला आहे. ही खडी वारंवार निसटून रस्त्यावर पसरते. भरपूर प्रमाणात धूळ उडते आणि रात्रीच्या वेळेस रस्ता देखील अस्पष्ट दिसतो. दुचाकी तसेच सायकल चालकांना या खडीतून वाहन चालवताना कसरत करावी लागते. तसेच अगदी थोड्या दिवसांपूर्वी शेजारीच असलेल्या नेवाळे वस्ती चौकात डांबरीकरण झाले. परंतु पिंगळे रोडवरील राधानंद स्वामी मठापासून ओढ्यापर्यंत जाणाऱ्या याच रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही. चांगल्या प्रकारचे डांबरीकरण या रस्त्यावर लवकरात लवकर करावे.
-हेमंत धांडे, नेवाळे वस्ती
PNE25V76905

सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत
कायमच रहदारीचा असणारा संभाजी चौक, प्राधिकरण सेक्टर २८, येथे सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असते. शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमीच चालू असते. प्राधिकरणमधून संभाजी चौक मार्गे बिजलीनगर, वाल्हेकरवाडी या भागात वाहनांची वर्दळ असते. कायमस्वरूपी एखादा वाहतूक नियमक नेमावा. निदान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत सिग्नल यंत्रणा चालू असावी. हीच नागरिकांची अपेक्षा आहे. एखादा अपघात होऊन उपाययोजना करण्यापेक्षा वेळीच काळजी घेतली पाहिजे.
-प्रणय हिंदुराव सावंत, प्राधिकरण
PNE25V76904

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com