‘ना हरकत दाखला’ ऑनलाइन मिळणार

‘ना हरकत दाखला’ ऑनलाइन मिळणार

Published on

पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. तो भरताना महापालिकेचा ‘ना हरकत दाखला’ आवश्यक आहे. तो सहजासहजी मिळावा, यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर विशेष ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे घरबसल्या ‘ना हरकत’ दाखल्यासाठी अर्ज करता येणार आहे.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या नियोजनात महापालिकेने ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड क्रमांक आणि आवश्यक वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. या प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने पार पाडता येणार आहे. अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी उमेदवारांना मदत व्हावी, यासाठी संकेतस्थळावर क्रमाक्रमाने अर्ज कसा करावा याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडिओदेखील उपलब्ध करून दिला आहे.

संकेतस्थळावर विविध माहिती
महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे, आरक्षण सोडत माहिती, अंतिम प्रभाग रचना तसेच प्रारूप प्रभाग रचना यासंबंधीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ती नागरिकांसह उमेदवारांसाठी उपलब्ध आहे.

‘ना हरकत’साठी असा करा अर्ज...
- उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी
- संकेतस्थळावर ‘मनपा सार्वत्रिक निवडणूक’ या पर्यायावर क्लिक करावे
- त्यानंतर ‘उमेदवारांसाठी ना हरकत दाखला प्रणाली’ या पर्यायामधून ऑनलाइन अर्ज सादर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com